विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis नक्षलवाद नष्ट होणार असेल आणि मुख्यमंत्र्यांनी पाऊल उचललं असेल तर ते अत्यंत विधायक आहे. त्याचे अभिनंदन आणि कौतुक करणं आपल्या सर्वांचं काम आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बंदुकीचे राज्य मोडून काढतील याची खात्री आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कौतुक केले.Devendra Fadnavis
राऊत यांनी आज समनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे. यावर बोलताना ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, सरकारशी किंवा त्यांच्याशी नक्कीच आमचे राजकीय मतभेद आहेत. राजकीय मतभेद असल्यावर एकमेकांवर टीका होते, महाराष्ट्रातील राजकारण टीकेपुरता मर्यादित राहिलेला नाही तर आता जहरी टीका व्हायला लागली आहे. तरीही आपण राज्याचे काही देणं लागतो. त्यांनी एखादे चांगलं पाऊल उचललं असेल आणि ते राज्याची कायदा सुव्यवस्था, राज्याची सामाजिक समीकरणे यांना दिशा देणारं असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्याचा कौतुक केलं पाहिजे. शिवसेनेची ही भूमिका हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे
देवेंद्र फडणवीस यांचा कौतुक का करू नये ? असा सवाल करत राऊत म्हणाले, गडचिरोली सारखा जिल्हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो, तिथे नक्षलवादात ज्या प्रकारचे हत्याकांड असेल, पोलिसांचे बळी गेले, सामान्य माणसांचे बळी गेले, हा जिल्हा विकासापासून वंचित राहिला आहे. गडचिरेली, चंद्रपूर ही सुवर्णभूमी आहे, मुख्यमंत्र्यांनी जसं सांगितलं की ती पोलाद सिटी म्हणून ओळखली जाईल, जमशेदपूर नंतर गडचिरोली ही पोलाद सिटी बनवणार असतील आणि तिकडच्या बेरोजगारांच्या हाती काम मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर ते या राज्याच्या हिताचं आहे. फडणवीस यांच्यासमोर दहा खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं, त्यांनी संविधान हाती घेतलं. याचा प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला कौतुक वाटलं पाहिजे.
राऊत म्हणाले, नरेंद्र मोदींनी जेव्हा चांगली काम केली तेव्हा त्यांचे कौतुक केलं आहे. गडचिरोलीत विकासाची गंगा वाहत असेल तर त्याचे जर कोणी कौतुक करणार नसेल तर ते चुकीचं आहे . या आधीच्या पालकमंत्र्यांचे काम आम्ही पाहिलं आहे म्हणून मला विकासाचे काम महत्त्वाचे वाटले. या जिल्ह्यातून येणारे खंडण्या गोळा करायचं असे काही लोकांनी ठरवलं होतं, तिकडला उद्योग खंडणी हप्ते गोळा करण्यासाठीच आहे असे काही लोकांनी ठरवले होते. त्यातून महाराष्ट्राचा काही फायदा झाला नाही, नक्षलवाद हा गरीबी आणि बेरोजगारीतून निर्माण झालेला राक्षस आहे
आम्हाला आणखीन पाच वर्षे विरोधी पक्षात काम करावे लागेल. राज्याच्या विकासामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे योगदान फार मोठं असावं लागतं. शिष्टाचार म्हणून माजी मुख्यमंत्री सध्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असतील. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सतत संवाद सुरू असतो त्याचे अनेक साधने असतात आणि त्या साधनांचा वापर होत असत. सामनाच्या माध्यमातून संवाद साधला असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्यावर बोलताना ते म्हणाले,कोणाचाही आवडता जिल्हा नसतो. जमिनीत काय लागतं काय उगवते काय पेरणी करून कापायला मिळते, त्याच्यावर आवडता जिल्हा निर्माण होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना पोलाद सिटी बनवू इच्छितात, आधीचे मुख्यमंत्री होते त्यांनी मंत्री असताना गडचिरोली यासाठी मागून घेतलं होते की तिथलं पोलाद खाणीचा उद्योग आहे
त्यांच्याकडून ज्या पद्धतीने खंडणी गोळा करण्यासाठी काही पांडव नेमले होते ते कसे काम करत होते ते महाराष्ट्राने पाहिलं आहे.
Chief Minister Devendra Fadnavis will break the gun rule, Sanjay Raut expressed confidence
महत्वाच्या बातम्या
- Amit Shah : काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता. आजही राहणार आहे, असं शाह यांनी ठामपणे सांगितले.
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- America : अमेरिकेत आणखी एक मोठा हल्ला; न्यूयॉर्कच्या नाईट क्लबमध्ये गोळीबार, 11 जखमी
- Nitish Kumar : लालूंनी नितीश कुमारांना इंडि आघाडीत परतण्याची दिली ऑफर