विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. केवळ एका मेसेज वर गडचिरोली जिल्ह्यातील एका चिमुकल्याच्या उपचारासाठी ते धावून गेले.
गडचिरोलीतील अतिदुर्गम भागातील सुनील पुंगाटी या मुलाची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्याच्या आईने उपचारासाठी मंगळसूत्र विकले. ही बाब समजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर तात्काळ उपचाराची सोय केली.
गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातील सुनील पुंगाटी या सतरा वर्षीय मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्याच्या आई-वडिलांनी त्याला दाखल केलं. हे दाम्पत्य चार दिवसांपासून उपाशी होते. पुढील खर्चासाठी त्यांना पैशांची गरज होती. ही परिस्थिती समोर येताच फडणवीस यांनी क्षणाचाही विलंब न करता या कुटुंबाला मदतीचा हात पुढे केला.
भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अर्थसंकल्पाचे कौतुक
मुलावर उपचारासाठी आई-वडिलांकडे पैसे नसल्याने मुलाच्या आईने मंगळसूत्र विकले आणि एक लाख रुपये रुग्णालयाकडे जमा केले. मात्र उपचारासाठी आणखी रक्कम हवी होती. त्यांना मुलाची देखभाल करत असताना खाण्यासाठी पैसे उपलब्ध नव्हते. चार दिवसांपासून पैशांची जमवा जमव करण्यासाठी त्यांनी पोटाला चिमटा दिला.
एका मेसेज द्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल रात्री ही माहिती समजल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख असलेले रामेश्वर यांना तात्काळ मोफत उपचारासाठी कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यातून भामरागडच्या त्या अतिदुर्गम भागातील सुनील पुंगाटी वर नागपूरच्या खाजगी रुग्णालयात आता पूर्णपणे मोफत आणि चांगले उपचार सुरू आहेत.
मंगळसूत्र विकून भरलेले एक लाख रुपये ही त्यांना परत मिळणार आहेत. एका मेसेजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत करून आपली पालकमंत्री पदाची जबाबदारी पार पाडली आहे.
Chief Minister Fadnavis rushed like a god to treat the boy
महत्वाच्या बातम्या
- Nirmala Sitharaman’ : कॅन्सरवरील औषधे, टीव्ही, मोबाईल आणि इलेक्ट्रिक कार होणार स्वस्त
- Modi Govt : मोदी सरकारची मध्यमवर्गीयांना आजपर्यंतची सर्वात मोठी भेट, एक लोक कोटी तोटा सहन करून १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
- Devendra Fadnavis भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अर्थसंकल्पाचे कौतुक
- नामदेव शास्त्री टीकेचीही तयारी ठेवा, मनसे नेते प्रकाश महाजन यांचा धनंजय मुंडे भेटीवरून इशारा