विशेष प्रतिनिधी
जळगाव : Cooperation Minister लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचं आहे म्हणून तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासनं देतो असे वादग्रस्त विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. यामुळे टीकेचा भडीमार हाेत आहे. यावर दुधाच्या व्यवसायासाठी पैसे दिलेले आहेत. या बँकेतून जे कर्ज देणार आहोत, त्यासाठी कर्जमाफीचा लाभ मिळू शकत नाही असं मी त्या ठिकाणी बोललो होतो, अशी मल्लीनाथी पाटील यांनी केली.Cooperation Minister
जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे एका बँकेच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बोलत होते. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे कर्जमाफीची मागणी केली जात आहे. मात्र, पाटील शेतकऱ्यांना सुनावत म्हणाले, लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचं आहे म्हणून तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासनं देतो. लोकांनी ठरवायला हवं की त्यांनी काय मागायचं आहे. एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भाईदास यांच्यासारखा माणूस गेला आणि लोकांनी सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल त्याला आम्ही मतदान करणार आहोत. लोकांनी काय मागावं हे ठरवावं. अनिलभाई आजची वेळ मारुन नेण्यासाठी नदीही देऊन टाकू तुला म्हणतील. म्हणून मित्रांनो मागणाऱ्यांनी काय मागायचं हे ठरवायला हवं. निवडणुकीत निवडून यायचं आहे म्हणून आम्ही आश्वासने देतोCooperation Minister
वादग्रस्त विधानामुळे टीका सुरू झाल्यावर पाटील यांनी माफी मागितली. ते म्हणाले,
“मी जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे बँकेच्या उद्घाटनासाठी गेलो होतो. ग्रामीण भागात अर्थव्यवस्था बळकट करायची असेल आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवायची असेल, तर आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील गोकुळसारखी व्यवस्था निर्माण करावी लागेल. त्यामुळे दिवसाला पैसे येतात. माझ्याही मतदारसंघात पतसंस्था आहे. आम्ही देखील दुधाच्या व्यवसायासाठी पैसे दिलेले आहेत. या बँकेतून जे कर्ज देणार आहोत, त्यासाठी कर्जमाफीचा लाभ मिळू शकत नाही असं मी त्या ठिकाणी बोललो होतो. मी सुद्धा शेतकरी आहे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
बाबासाहेब पाटील म्हणाले, “माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर विरोधकांकडून कर्जमाफीच्या मुद्द्यावरून जे राजकारण केले जात आहे. त्याला उद्देशून मी ते विधान केले होते की, कर्जमाफीचा नाद लागला आहे. दूधासाठी देण्यात येणारे कर्ज हे कर्जमाफीच्या निकषात बसत नाही, एवढंच मी बोललो होतो. त्यामुळे जनतेला ठरवावे लागेल की, लोकप्रतिनिधिंकडे काय मागायचे आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी माफी मागतो. माझे वक्तव्य असंवेदनशील नव्हते, तर त्या प्रसंगाला अनुरूप होते.
Cooperation Minister, who is demanding loan waiver, and it was not meant to be said, it was clarified.
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा