विशेष प्रतिनिधी
पुणे : भोंदूबाबा अशोक खरातचा सीए असलेल्या पोफळे कुटुंबाकडे कोरेगाव पार्कमधील कोट्यवधीची मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे.
शहरातील अत्यंत महागड्या समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात घोरपडी येथील सुमारे ४८७९.६० चौ. मीटर (सुमारे सव्वा एकर) क्षेत्रफळाची मोठी मालमत्ता २०२४ मध्ये हस्तांतरित झाल्याची नोंद समोर आली आहे. या व्यवहाराची एकूण बाजार किंमत तब्बल १९ कोटी ५६ लाख ६४ हजार १०० रुपये इतकी नोंदवण्यात आली असून, या व्यवहारामुळे पुन्हा एकदा शहरातील रिअल इस्टेट व्यवहारांवर चर्चा रंगली आहे.
दुय्यम निबंधक हवेली क्रमांक २३ कार्यालयात दस्त क्रमांक ६५८७/२०२४ अंतर्गत हा ट्रान्सफर डीड नोंदविण्यात आला आहे. १६ मार्च २०२४ रोजी दस्त नोंदणी पूर्ण झाली. या व्यवहारावर तब्बल १ कोटी ३६ लाख ९६ हजार ५०० रुपये मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले आहे.
सदर मालमत्ता घोरपडी, कोरेगाव पार्क इस्टेट येथील सी.टी.एस. नं. ५७ मध्ये असून, त्यावर रो हाऊस क्रमांक ९ ते १६ असे एकूण बांधकाम आहे. या रो-हाऊसेसचे एकूण बांधकाम क्षेत्र १७७५.३ चौ. मीटर असल्याचे दस्तऐवजात नमूद आहे. संबंधित मालमत्तेला पुणे महानगरपालिकेचे १९९८ सालचे भोगवटा प्रमाणपत्र (OC) देखील आहे.
या व्यवहारात विक्रेत्यांच्या बाजूने मुल्ला कुटुंबातील अनेक सदस्यांचा समावेश असून, त्यांच्या वतीने अधिकृत प्रतिनिधी म्हणून मुंबई येथील रहीम कासमअली मरेडिया यांनी प्रक्रिया पूर्ण केली. तसेच ‘अमिगो कन्स्ट्रक्शन प्रा. लि.’ या कंपनीने संमती देणारा पक्ष म्हणून सहभाग नोंदवला आहे.
खरेदीदार म्हणून प्रकाश रामकृष्ण पोफळे (वय ७३) आणि मोनिका ललित पोफळे (वय ४६) यांची नावे नोंदवली गेली आहेत. दोघेही पुण्यातील घोरपडे पेठ परिसरातील रहिवासी आहेत.
कोरेगाव पार्कसारख्या प्रीमियम भागात इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेला हा व्यवहार लक्षवेधी ठरत असून, शहरातील उच्चभ्रू मालमत्तांच्या वाढत्या किमतींचे हे आणखी एक उदाहरण मानले जात आहे.
Crores-Worth Koregaon Park Property Linked to Ashok Kharat’s CA Pofale Family
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर