Devendra Fadnavis : मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा दैनंदिन निर्वाह भत्ता वाढणार, मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय

Devendra Fadnavis : मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा दैनंदिन निर्वाह भत्ता वाढणार, मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Devendra Fadnavis : मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्ता वाढवणे, राज्यात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारण्यासह अनेक महत्वाचे निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील पायाभूत सुविधांसाठी असलेल्या उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीत मुख्यमंत्र्‍यांसह इतर मंत्री सदस्य म्हणून असतील. त्याशिवाय शेतकऱ्यांसाठी राज्यातील विविध बाजार समितीमध्ये ७९ शेतकरी भवन उभारण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले ८ महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे : महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ जाहीर. सन २०५० पर्यंतचे नियोजन. सुमारे ३ हजार २६८ कोटी रुपयांचा आराखडा (उद्योग विभाग)राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा.राज्यातील पायाभूत प्रकल्पांबाबत यापुढे उपसमिती यापुढे मंत्रिमंडळ समिती म्हणून कामकाज करणार (नियोजन विभाग)अकोला येथील दि निळकंठ सहकारी सूतगिरणीला “खास बाब” म्हणून शासन अर्थसहाय मिळणार.



अर्थसहाय्याच्या ५:४५:५० या गुणोत्तरानुसार निवड (वस्त्रोद्योग विभाग) मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्ता तसेच विद्यार्थींनीसाठीच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात सुमारे दुपटीने वाढ. हजारो विद्यार्थी- विद्यार्थिनींना दिलासा (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य)राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस पुढील दोन वर्षांसाठी मुदतवाढ. राज्यभरात ११६ बाजार समित्यांमध्ये नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी, व अस्तित्वातील भवनांच्या दुरूस्तीसाठी असा एकूण १३२ कोटी ४८ लाखांचा खर्च. विविध ठिकाणी ७९ नवीन शेतकरी भवन उभारण्याचे प्रस्ताव. (सहकार व पणन विभाग)आधुनिक संत्रा केंद्र उभारण्याच्या योजनेस २ वर्षे मुदतवाढ. नागपूर, काटोल, कळमेश्वर, (जि.नागपूर), मोर्शी (जि.अमरावती ) व संग्रामपूर, (जि.बुलढाणा) येथे आधुनिक संत्रा केंद्र उभारण्यात येत आहेत.

मुदतवाढीसह योजनेच्या स्वरुपात अनुषंगिक बदल करण्यास मान्यता (सहकार व पणन विभाग)भंडारा ते गडचिरोली दरम्यान ९४ किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग. प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार. प्रकल्पाच्या आखणीस व भूसंपादनास मान्यता. भुसंपादनासह अनुषंगिक ९३१ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग)नवीनकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी संयुक्त उद्यम कंपनी. महानिर्मिती व मे.सतलज जलविद्युत निगम लि. यांची संयुक्त उद्यम कंपनी स्थापन करण्यास मान्यता. राज्यभरात ५ हजार मेगावॅट क्षमतचे प्रकल्प विकसित करणार (ऊर्जा विभाग)

Daily subsistence allowance of students in backward class government hostels will increase, important decisions in cabinet meeting.Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023