विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव आले तर राजीनामा घ्यावाच लागणार. यामधे नैतिकता येतच नाही. चौकशी निष्पक्ष व्हावी. यासाठी दिलेला राजीनामा हा नैतिकतेचा राजीनामा असतो, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी निशाणा साधला आहे.
बीड सरपंच हत्या प्रकरणावरुन संशियत आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर टीका करताना कोल्हे म्हणाले. “विजय शिवतारे यांना राज्याच्या गृहमंत्र्यांविषयी काही म्हणायचे नाही का? फक्त अजितदादांच्या पक्षातील एका नेत्याचे नाव येतं तोपर्यंत इथे विषय थांबत नाही. मात्र एखादा गुन्हेगार व्हिडिओ करून शरण येतो म्हणजे तो यंत्रणेवर उपकार करतो का? यामध्ये गृह मंत्रालयाचे अपयश नाहीये का? सोयीने आरोप करण्यापेक्षा या घटनेचे मुळ पाहिलं पाहिजे. ही एक हत्या आहे. मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. यामध्ये कोणतंही राजकारण आणायला नको”, असं अमोल कोल्हे म्हणाले.
बीडमधील प्रकरणात या आरोपींना कोणी राजकीय व्यक्ती जर पाठिंबा देत असेल त्यासाठी कठोर भूमिका घेतली पाहिजे. त्यातच बीड जिल्ह्यातील राजकारण्यांनी सुद्धा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. धनंजय मुंडे यांचे नाव जर सातत्याने समोर येत असेल तर त्यांनी नैतिकतेने राजीनामा देणे गरजेचे आहे. मात्र, राजीनामा न देता या गोष्टी अशाच पुढ नेल्या जात असल्याने कोणाला पाठीशी घातलं जातेय का? ही शंका येत आहे, असेही कोल्हे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची अवस्था गाढवाच्या सल्लागारासारखी झाली आहे अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार कोल्हे म्हणाले “आशिष शेलार यांना विसर पडला असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवारांचं कौतुक केलं आहे. भाजपच्या सरकारने कृषी क्षेत्राच्या योगदानासाठी शरद पवार यांना देशातील सर्वोच्च पुरस्कार देवून कौतुक केले आहे.
Dhananjay Munde should resign ethically, MP Dr. Amol Kolhe Demanded
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे गटाचे स्वबळावरच निवडणुका लढविण्याचे संकेत, महाविकास आघाडीत फूट स्पष्ट
- Sanjay Raut स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, संजय राऊत यांची आरोळी
- वाल्मिक कराड वगळता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का
- Sanjay Raut काही लोक मुख्यमंत्रीपदाचा कोट शिवून बसले होते, संजय राऊत यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल