Manoj Jarange धनंजय मुंडे यांचे परळी ते मुंबई बरेच लफडे, मनोज जरांगे यांचा थेट आरोप

विशेष प्रतिनिधी

जालना : धनंजय मुंडे हे कोणत्या जातीचे नाही तर सरकारचे मंत्री आहेत. धनंजय मुंडे यांचे परळी ते मुंबई बरेच लफडे आहेत. धनंजय मुंडेंना जातीयवाद निर्माण करायचा आहे. तेच प्रतिमोर्चे काढायला लावत आहे. त्यांना जातीय दंगली घडवून आणायच्या आहेत. मंत्र्यांना बोललो म्हणजे जातीला बोललो का? असा प्रश्न मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. Manoj Jarange

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी जालना शहरात काढण्यात आलेल्या मोर्चात ते बोलत होते.

मनोज जरांगे म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी बोलो तर जातीयवाद होतो का? धनंजय देशमुख यांना तुम्ही पोलीस ठाण्यात धमकी देतात. आम्ही गुंडांवर बोलायचे नाही का? धनंजय मुंडे हे कोणत्या जातीचे नाही तर सरकारचे मंत्री आहेत. ते ओबीसीचे पांघरुण घेत आहे. मंत्र्यांना बोललो म्हणजे जातीला बोललो असं आहे का? जनता मंत्र्यांनाच बोलत असते. रस्त्यावर फिरू देणार नाही हे जनता रोषाने बोलते, असे मनोज जरांगे म्हणाले.

धनंजय मुंडेंना जातीयवाद निर्माण करायचा आहे. तेच प्रतिमोर्चे काढायला लावत आहे. त्यांना जातीय दंगली घडवून आणायच्या आहेत. आम्ही आमच्या गरीब लेकरांच्या बाजूने बोलायचे नाही का?मराठ्यांना आरक्षण मागतोय हा कोणता जातीयवाद आहे, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

ते जातीय तेढ निर्माण करत असून लाभार्थी टोळीला आमच्याविरोधात बोलायला लावत आहे. धनंजय मुंडे यांचे परळी ते मुंबई बरेच लफडे आहेत. त्यांना 25 तारखेनंतर कायदेशीर बघणार. त्यांना सांगितले होते खेटू नका ते खेटले मग आता त्यांना बघणार. ते गुंडाच्या टोळ्या सांभाळत आहेत, असा संताप जरांगे यांनी व्यक्त केला.

Dhananjay Munde’s Parli to Mumbai lot of gossip, direct accusation of Manoj Jarange

महत्वाच्या बातम्या