विशेष प्रतिनिधी
डोंबिवली: महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. कल्याण पूर्वमधील दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर आयोजित जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत महापालिका निवडणूक प्रचाराची औपचारिक सुरुवात केली. Eknath Shinde
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा टांगा पलटला असून, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या घोड्यांचीही पळापळ होईल, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी विरोधकांवर थेट हल्लाबोल केला.
या पक्षप्रवेश सोहळ्यात काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन पोटे, काँग्रेसच्या माजी नगरसेविका जान्हवी पोटे, मनसेचे माजी नगरसेवक कस्तुरी देसाई आणि कौस्तुभ देसाई यांच्यासह काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी सचिन पोटे यांचे विशेष कौतुक करत त्यांना लढवय्ये आणि प्रामाणिक कार्यकर्ते असल्याचे सांगितले. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केले, तेथे जबाबदारीने आणि निष्ठेने काम केल्याचेही त्यांनी नमूद केले.
विरोधकांच्या टीका आणि टोमण्यांवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील जनतेच्या विकासासाठी काम करत असताना कोण काय बोलते याकडे आम्ही लक्ष देत नाही. आरोपांना आरोपातून नव्हे, तर कामातून उत्तर दिले जाते, आणि टीकेला टीकेतून नव्हे, तर विकासकामांतूनच प्रत्युत्तर दिले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.
Even Their Horses Will Flee in Civic Elections,” Eknath Shinde Jibes
महत्वाच्या बातम्या
- Nana Patole : महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा, नाना पटोले यांची पंतप्रधानांकडे मागणी
- Valmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज फेटाळला
- माणिकराव काेकाटे यांना पाेलीसांनीच पळवले, प्रकाश आंबेडकर यांचा आराेप
- हे देशप्रेम नव्हे तर पाकिस्तान प्रेम, एकनाथ शिंदे यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर संताप