विशेष प्रतिनिधी
मुंबई : Neelam Gorhe ज्यांनी तुम्हाला सोडून जाण्याचा निर्णय घेतला, तो का घेतला याचा कधी विचार केला आहे का? तुम्ही केवळ आम्हालाच नाही तर अधिकाऱ्यांनाही भेटत नव्हता. माझ्या या विधानामुळे मला ट्रोल केले जाईल किंवा मी लोकांच्या निशाण्यावर येईल याची मला जाणीव आहे. पण सत्य बोलणे आता गरजेचे झाले आहे,” अशा शब्दांत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.Neelam Gorhe
विधान परिषदेतील आपल्या सहा वर्षांच्या कार्यकाळाचा समारोप करताना उद्धव ठाकरे यांनी कवितांच्या माध्यमातून आपली खंत व्यक्त केली. मात्र, त्यांच्या भाषणातील उपरोधिक टोलेबाजीवर नीलम गोऱ्हे यांनी जोरदार पलटवार केला. त्या म्हणाल्या, उद्धव ठाकरे आम्हाला तर भेटत नव्हतेच पण अधिकाऱ्यांना देखील भेटत नव्हते. मिलिंद तर आमच्या सारख्या कोरोना टेस्ट करायचा. कोविडमध्ये काम केले असे ते म्हणतात. अहो पण शिंदेसाहेब देखील काम करत होते. त्यांनी पिपीई किट घालून काम केले ना…. ते म्हणाले रेडा कापला.. अहो तुम्ही श्रद्धेच्या नावाने काय काय करत होतात, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहेNeelam Gorhe
- तालिका सभापती परिस्थिती बघून निर्देश देऊ शकतात, पण ते ब्रह्मवाक्य नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट
उद्धव ठाकरे यांनी अनेक कविता वाचून दाखवल्या. ती कविता ही त्यांच्या बाबतीतच होती, असा टोला मारत निलम गोऱ्हे म्हणाल्या, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी आम्हाला बरे वाटले. पण शेवटच्या १ वर्षात आमचा भ्रमनिरास झाला. हे वर्ष वर्ष कुणाला भेटत नव्हते. तिथ गेले की लक्षात यायचे की त्यांना आम्ही नको आहोत. काही झाले की सोडून गेले… सोडून गेले… पण का सोडून गेले त्याचा विचार करा ना…
उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेच्या ९ आमदारांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज अधिवेशनात या विधान परिषद सदस्यांना निरोप देण्यात आला. यावेळी आपल्या निरोप समारंभाच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ कवी सुरेश भट आणि विंदा करंदीकर यांच्या कवितांचा आधार घेतला. ‘केले कुणास्तव ते किती, ते मोजू नये…’ या ओळींचा संदर्भ देत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. “ज्यांना मोठे केले, तेच सोडून गेले,” अशी भावना व्यक्त करत त्यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली.
“Ever Wonder Why We Left You?” Neelam Gorhe Targets Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या