विशेष प्रतिनिधी
जळगाव: चाळीसगाव येथील पोलीस उपनिरीक्षक महिला पोलिसाकडे शरीरसुखाची मागणी करत असल्याचा आरोप केल्याने माजी खासदार उन्मेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. जळगावचे माजी खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उन्मेश पाटील यांच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांच्याविषयी जाहीर भाषणात आक्षेपार्ह वक्तव्य, बदनामीकारक आरोप आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
२८ जून रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याबाहेर एका प्रकरणाच्या निषेधार्थ धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात उन्मेश पाटील सहभागी झाले होते. आंदोलकांना संबोधित करताना त्यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांच्यावर गंभीर आरोप करत अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप आहे.
भाषणादरम्यान उन्मेश पाटील यांनी पीएसआय घुले हे निष्पाप तरुणांविरोधात खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देत असल्याचा आरोप केला. तसेच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला. या वक्तव्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरही समोर आले आहेत.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेतील एका पोलीस कर्मचाऱ्याने अधिकृत तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५२ आणि ३५६(३) अंतर्गत उन्मेश पाटील यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Ex-MP Unmesh Patil Booked After Alleging PSI Sought Sexual Favours from Woman Constable
महत्वाच्या बातम्या
- राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई, तर ३३ जणांना बेड्या!!
- शिक्षा संस्कृति उत्थान न्यासाची राष्ट्रीय प्रांत संयोजक बैठक पुण्यात सुरू; राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, भारतीय ज्ञानपरंपरेवर मंथन
- Florida Test : जेफ बेझोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ला मोठा धक्का; फ्लोरिडात चाचणीदरम्यान ‘न्यू ग्लेन’ रॉकेटचा भीषण स्फोट
- NIA : पाकिस्तानशी जोडलेल्या दहशतवादी जाळ्यावर NIAची मोठी कारवाई; राजस्थानसह ४ राज्यांत धाडसत्र