कौशल्य विकासाचे नवीन युग: मंत्री पाटील यांच्या हस्ते ‘फ्युएल’ (FUEL) शिक्षण संस्थेचा एनएसई सोशल स्टॉक एक्स्चेंजमध्ये पदार्पण

फ्युएल-एनएसई बेल रिंगिंग सोहळ्यात ‘कमवा आणि शिका’ मुलींसाठी विद्यावेतन जाहीर करण्याचा विचार व्यक्त

विशेष प्रतिनिधी

मुंबई: महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोंढा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) मध्ये एक ऐतिहासिक सोहळा पार पडला. यावेळी ‘फ्युएल’ (Friends Union for Energising Lives) संस्थेचा सोशल स्टॉक एक्स्चेंज (SSE) प्लॅटफॉर्मवरील सूचीकरणाचा (Listing) ‘बेल रिंगिंग’ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ‘FUEL

या सोहळ्यात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ४० मुलींसाठी फ्यूल च्या ‘कमवा आणि शिका’ या क्रांतिकारी उपक्रमाची घोषणा केली. याअंतर्गत या शैक्षणिक वर्षापासून शासनातर्फे महाराष्टातील विद्यार्थिनींना दरमहा २,००० रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. राज्य सरकार, एनएसई आणि फ्युएल यांच्यातील ही भागीदारी महाराष्ट्रातील गरजू मुलींसाठी मोफत शिक्षणाची दारे उघडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जेव्हा विद्यार्थ्यांना स्पष्ट दिशा मिळते, तेव्हा ते स्वतःचा आणि समाजाचा विकास करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करतात. आम्ही या कौशल्य आणि शिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांचे जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध आहोत. भविष्यात फ्यूल स्किल टेक यूनिवर्सिटीच्या सहाय्याने हजारो कोशल्याने परिपूर्ण विद्यार्थी तयार होतील.



या कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, एनएसईचे एमडी आणि सीईओ श्री. आशिष कुमार चौहान, फ्युएलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे आणि कॅपजेमिनीचे अनुराग प्रताप यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी फ्युएलचे कौतुक करताना सांगितले की कौशल्य विकास आणि शिक्षण क्षेत्रातील भविष्यातील मार्गदर्शक म्हणून फ्युएल स्किल्स टेक यूनिवर्सिटी नावारूपाला येईल. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून फ्यूल आता स्किल टेक यूनिवर्सिटी म्हणून सुरू होईल. आजच्या एनएसई लिस्टिंगमुळे मुलीच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध होतील.

श्री. आशिष कुमार चौहान यांनी सांगितले की, फ्युएलने एसएसई प्लॅटफॉर्मद्वारे सुमारे ९९ लाख रुपये यशस्वीरित्या उभे केले आहेत. सामाजिक गुंतवणुकीच्या लोकशाहीकरणावर भर देताना त्यांनी नमूद केले की, या निधीपैकी ३७% वाटा किरकोळ देणगीदारांचा (Retail Donors) आहे. एनएसई प्लॅटफॉर्म आता देशातील ९९.८५% पिन कोडपर्यंत पोहोचला असून सामान्य नागरिकांनाही सामाजिक बदलात सहभागी होण्याची संधी मिळत आहे.

फ्युएलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे यांनी २० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या फ्युएलच्या प्रवासापासून ते आता स्किल टेक युनिव्हर्सिटी होण्यापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्यांनी शिक्षण आणि रोजगार यातील दरी कमी करण्यासाठी सेंजेटटा आणि Global Capability Centers (GCC) सोबत नवीन धोरणात्मक भागीदारी जाहीर केली. भविष्यात शंभर कोटी चा इशू आणणार आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आणि मुलीच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचे ध्येय आहे. मानसी सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले.

‘FUEL’ Educational Institution Debuts on the NSE Social Stock Exchange

महत्वाच्या बातम्या