विशेष प्रतिनिधी
अमरावती: शहरातल्या परतवाडा येथे अनेक मुलींचे शोषण आणि आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.कोण जास्त मुली आपल्या जाळ्यात ओढणार आणि मोहित करण्यात अशाप्रकारची पैजच दोन्ही आरोपींमध्ये लागली होती असल्याचं समोर आलं आहे.लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला अयान अहमद आणि दुसरा आरोपी उझेर खान या दोघांमध्येह ही पैज लागली होती.अयान खान आणि मुलींचे अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडिओ काढून उझेर खानला पाठवत होता.
मुख्य आरोपी असलेल्या अयान अहमद हा अमरावती शहरातील आपल्या मित्राची रूम काही तासांचे पैसे देऊ त्याठिकाणी मुलींवर अत्याचार करत होता.मुख्य आरोपी अयान अहमद ला ताब्यात घेतल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला.पोलिस चौकशीत आरोपी अयान अहमद ने सांगितले की,त्याने अमरावती मधील त्याचा मित्राच्या रूम वर घेऊन जाऊन दोन मुलींचे लैंगिक शोषण केले.पोलिसांकडून रूम देणाऱ्या मित्राला देखील ताब्यात घेतले आहे.पीडित मुली अजूनही पुढे आल्या नसल्यातरी तांत्रिक पुराव्यावरून मुलींवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रकरण उघडकीस कसं आलं?
अयान अहमद आणि उजेर खान यांच्यात मुली आकर्षित करण्यावरून पैज लागली होती.मात्र पुढे ही शर्यत एका घाणेरड्या छंदात परावर्तीत झाली.दोन्ही आरोपी मुलींसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढायचे आणि ऑनलाईन प्लॅटोफॉर्मवर अपलोड करायचे.
मात्र पुढे काही दिवसांनी अयान अहमद आणि उझेर खान यांच्यात वाद झाला.दोघांमध्येह पैशाच्या व्यवहारातून मोठा वाद झाला.वादाच्या रागातूनच उझेर खान याने मुख्य आरोपी असलेल्या अयान अहमद चे सर्व आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्यास सुरुवात केली.दोन्ही आरोपींच्या वादानंतर परतवाडा येथील तरुणींचं लैंगिक शोषणाचं प्रकरण उघडकीस आलं.
प्रकरणात एकूण आरोपी किती?
१६ एप्रिल पर्यंत पोलिसांनी ऐकून संबंधित प्रकरणात ४ आरोपींना अटक केली आहे.
अयान अहमद तन्वीर अहमद (१९) ह्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याने अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार केले आहेत.
उझेर खान इकबाल खान (२२) चित्रित केलेलं आक्षेपार्ह व्हिडिओ व्हिडिओ डाउनलोड करून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शेअर करणारा.
मोहम्मद साद मोहम्मद साबीर (२२)सर्व व्हिडिओ व्हाट्सअप च्या माध्यमातून शेअर आणि वायरल करणारा.
तरबेज खान तस्लिम खान (२४) मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्यात सक्रिय असलेला.
Girls’ attraction; Money dispute! How did the Amravati sexual abuse case come to light?
महत्वाच्या बातम्या