विशेष प्रतिनिधी
पुणे : Eknath Shindeसातारा जिल्ह्यातील सावरी येथील ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील “हॉटेल तेजयश प्रकाश शिंदेंचेच आहे आणि अजूनही तेच चालवत आहेत, असा आराेप करत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचे बंधू प्रकाश शिंदे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
“हॉटेल तेजयश माझे नाही, मी ती जागा चालवायला दिली आहे,” असा दावा प्रकाश शिंदे यांनी केला होता. मात्र, आज भर पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी गुगल मॅप आणि व्हॉट्सॲप लिंकचा ‘लाईव्ह डेमो’ दाखवत,हे हाॅटेल प्रकाश शिंदे यांचेच असल्याचे सांगितले.
सुषमा अंधारे(Sushma Andhare)यांनी पत्रकार परिषदेत हॉटेल तेजयशचे गुगल लोकेशन ओपन केले. यावेळी त्यांनी दाखवून दिले की, हॉटेलच्या ऑनलाइन बुकिंगसाठी दिलेल्या व्हॉट्सॲप लिंकवर क्लिक करताच थेट प्रकाश शिंदे यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचे नाव समोर येते. एवढेच नव्हे, तर त्या व्हॉट्सॲप नंबरचा डीपी ओपन केल्यास तिथे हॉटेल तेजयशचा फोटो दिसतो. “जर हॉटेल दुसऱ्याला चालवायला दिले आहे, तर बुकिंगसाठी प्रकाश शिंदेंचा नंबर का? आताही प्रकाश शिंदे यांना खोटे बोलायचे आहे का?”
पाचगणीत ४५ किलो कोकेन सापडल्याचा संदर्भ देत अंधारे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाईंवरही निशाणा साधला. “मुंबईचे पोलीस येऊन कारवाई करतात आणि पालकमंत्र्यांना पत्ताही नसतो. पाचगणीसारख्या ‘मिनी स्वित्झर्लंड’ला कोकेनचा विळखा पडला असताना पालकमंत्री काय करत आहेत? कुणी बॉम्बब्लास्ट करून गेले तरी यांना कळणार नाही.
अंधारे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले. त्या म्हणाल्या, “ओंकार डिघे हा स्पॉटवर असताना त्याला अटक का झाली नाही? तो नंतर रात्री उशिरा स्वतःहून मुंबईच्या युनिट नंबर ७ कडे हजर होतो, हे संशयास्पद आहे. याचा अर्थ, सत्ताधाऱ्यांशी संबंधित लोकांना पोलीस अटक करत नाहीत, तर ते स्वतःच्या सोयीने हजर होतात. वाल्मीक कराड, प्रशांत कोरटकर ही याचीच उदाहरणे आहेत.”
पोलीस तपासातील हलगर्जीपणा उघड करताना अंधारे यांनी सावरी येथील घटनाक्रमाचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, “काल आमची पत्रकार परिषद आटोपल्यानंतर अवघ्या दोन तासांत सातारा पोलिस सावरीला पोहोचले होते. त्यांच्या पाठोपाठ एक वृत्तवाहिनी पोहोचली. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्याला विचारले असता, आमच्याकडे काही तपास नाही, मी सहज आलो असे सांगितले जाते. जर सातारा पोलिसांकडे तपास नाही, तर इतक्या तत्परतेने सातारा पोलिस तिकडे का पोहोचले? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.Sushma Andhare
पोलिसांनी तिथे काहीतरी सामान उचलले, तर त्याचा काही गैरवापर होऊ नये, यासाठी ते उचलल्याचे पोलिस सांगतात. दार उघडल्यानंतर आत एक चाळीस लीटर निळ्या रंगाची कॅन दिसते.
याबाबत पोलिसांना विचारले असता, ते म्हणतात की, हे राहिलेले सामान होते, चुकून राहिले असेल. जर सावरीला एवढी मोठी कारवाई झाली होती, तर ती कॅन चुकून कशी राहील? आणि जर चुकून राहिली असेल, तर हा कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अक्षम्य हलगर्जीपणा आहे.Sushma Andhare
गृहमंत्र्यांनी अशा अधिकाऱ्यांची ताबडतोब चौकशी लावली पाहिजे. एवढे मोठे लिक्वीड चुकून कसे राहील?”असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
पोलिसांनी आधी सर्व परिसर ‘क्लिन’ केला होता, मग आता अचानक तिथे पुन्हा कॅन कसा सापडतो? यावरअंधारे यांनी शंका उपस्थित केली. “याचा दुसरा अर्थ असा होतो की, त्या भागात अजूनही फॅक्टरी सुरू आहे किंवा ड्रग्ज माफियांचा वावर तिथे आहे,” असा आरोप त्यांनी केला.
Hotel Tejash Prakash Shinde belongs to” in drug racket case, Sushma Andhare attacks Eknath Shinde by showing evidence
महत्वाच्या बातम्या
- Nana Patole : महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा, नाना पटोले यांची पंतप्रधानांकडे मागणी
- Valmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज फेटाळला
- माणिकराव काेकाटे यांना पाेलीसांनीच पळवले, प्रकाश आंबेडकर यांचा आराेप
- हे देशप्रेम नव्हे तर पाकिस्तान प्रेम, एकनाथ शिंदे यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर संताप