विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sharad Pawar शेतकरी प्रेमाची कितीही सरकारविरोधी भाषणे करा. मात्र आपल्या इतिहासाचा वास्तव चेहरा भयाण आहे. शरद पवार कृषी मंत्री असताना ५५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. वेगळ्या शब्दात मांडायचं तर, पवार यांच्या ५० वर्षाच्या राजकीय आयुष्यात रोज सरासरी ४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही? असा सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
नाशिकच्या शेतकरी मोर्च्यात शरद पवारांनी सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला होता. त्याला प्रत्युत्तर देत भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की, शरद पवार आता शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकारण करतायत, पण इतिहासात डोकावलं तर तुमच्या सत्तेच्या काळात केलेल्या हजारो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे आत्मे प्रश्न विचारताना दिसतील. आज शेतकऱ्यांच्या मोर्चा काढून जी भाषणे ठोकता, त्यातील शहाणपणा तेव्हा कुठे गायब झाला होता? शेतकरी कर्जमाफी केल्याचा डांगोरा पिटत प्रत्यक्षात शेतकऱ्यांना बाबाजी का ठुल्ला देत बॅंकांची भरपाई पवारांनी केली. Sharad Pawar
स्वामीनाथन समितीचा अहवाल शरद पवारांनी दाबला असा आराेप करून उपाध्ये म्हणाले, शेतकऱ्यांनी मोर्चा काढला तर त्यांच्या मागण्यांवर बोलण्याऐवजी त्यांच्या नेत्यांची जात पवारांनी काढली. कांद्याचे भाव कधी वाढतील या प्रश्नाचे उत्तर देताना ‘मी ज्योतिषी नाही’ असंही पवारांनी म्हटलं होते. लवासासाठी हजारो एकर शेती घेताना ज्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला ते शरद पवारच होते. सगळ्याच प्रश्नांची सुरुवातच इथे झाली आणि उत्तरेही इथेच येऊन थांबतात. शेतकरी प्रेमाची कितीही सरकारविरोधी भाषणे करा मात्र आपल्या इतिहासाचा हाच भयाण वास्तव चेहरा आहे. किती उगाळायचा इतिहास, उगाळेल तेवढा काळाच. Sharad Pawar
नाशिकच्या सभेत बोलताना पवार म्हणाले हाेते, देवाभाऊ, सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही तुमचे फोटो लावले. शिवाजी महाराजांचं दर्शन घेत आहात, हे तुम्ही देशामध्ये दाखवलं. शिवछत्रपती एक वेगळे राजे होते. त्यांच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्याच्याकडं नांगराचीही व्यवस्था नव्हती. तेव्हा शिवाजी महाराजांनी नांगराचा फाळ बसवण्यासाठी शेतकऱ्याला सोनं दिलं. सोन्याच्या फाळाने त्यांनी शेतीची नांगरणी केली. बळीराजा उपाशी राहिला तर देश उध्वस्त होईल असंही महाराज म्हणाले. हा आदर्श शिवाजी महाराजांचा आज देवाभाऊ घेतील, असं आम्हाला वाटत होतं. पण ठिकठिकाणी मोठीमोठी होर्डिंग, मोठेमोठे पोस्टर्स, मोठीमोठी चित्र त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव घेऊन लावली, पण त्या बळीराजाच्यासाठी ढुंकवून बघायला तयार नाहीत. असंच चित्र असेल तर आपल्याला निकाल घ्यावा लागेल. Sharad Pawar
How come Sharad Pawar doesn’t stumble when asking others for answers? BJP questions on farmer suicides
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा