जितेंद्र आव्हाड म्हणाले, मला माझीच लाज वाटतेय. स्वत:ला मर्द का म्हणवून घेत आहोत…

जितेंद्र आव्हाड म्हणाले, मला माझीच लाज वाटतेय. स्वत:ला मर्द का म्हणवून घेत आहोत…

विशेष प्रतिनिधी

मुंबई: आता मला माझीच लाज वाटतेय. आपण स्वत:ला मर्द का म्हणवून घेत आहोत, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

पत्रकारांशी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर प्रसिद्ध इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याच्यावर आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले , मला माझीच स्वतःची लाज वाटतेय. आम्ही स्वतःला मर्द का म्हणवून घेतोय याबाबत लाज वाटतेय. कारण कोणीतरी टीनपाट उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर काही तरी बोलतो. कोरटकर आणि राहुल सोलापूरकर ही दोन हलकट माणसं काहीतरी बोलतात आणि पळून जातात. कोरटकर गुहाटीमध्ये लपला आहे.

लढाई माझी नाही. तुमच्या माझ्या अस्मितेची आहे. प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरला जोपर्यंत चापट्या बसत नाहीत, तोपर्यंत शांत बसणार नाही. जोपर्यंत यांचं तोंड रंगवत नाही, तोपर्यंत जिवाला शांतता मिळणार नाही. या लोकांना राजाश्रय असणार, त्याशिवाय गायब होतात का? असा आरोप आव्हाड यांनी केला.

यावेळी त्यांनी राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्यावरही टीका केली. पुणे बलात्कार प्रकरणातील तरुणी ओरडली का नाही? असा सवाल योगेश कदम यांनी केला होता. त्यावरून आव्हाड म्हणाले, आपला मंत्री म्हणतो ती ओरडली नाही. या मंत्र्याला लाजलज्जा शरम आहे की नाही? तो लहान आहे. त्याच्या वडिलांना सांगायचं आहे की असं बोलू देऊ नका.

प्रसिद्ध कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या सिनेमातील कवितांना सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. तसेच कोण नामदेव ढसाळ? असा उर्मट सवालही सेन्सॉरच्या एका अधिकाऱ्याने केला आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. सेन्सॉर म्हणतोय कोण नामदेव ढसाळ… सांस्कृतीक दहशतवाद निर्माण केला जातोय. सेन्सॉर बोर्डात बसलेला कोण तो? काय त्याची लायकी?असा सवाल आव्हाड यांनी केला.

Jitendra Awhad said, I am ashamed of myself. Why are we calling ourselves men…

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023