विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत सत्तासंघर्षाला आता नवे आणि गंभीर वळण मिळाले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे पक्षात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. 28 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीत झालेला सर्व पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, अशी त्यांनी केलेली मागणी आता उलट पक्षालाच अडचणीत आणणारी ठरू शकते.
या पत्राचा परिणाम पार्थ पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 16 फेब्रुवारी रोजी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्राच्या आधारेच पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती.
मात्र, सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रामुळे तोच पत्रव्यवहार अवैध ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.
या कालावधीत पक्षात झालेल्या महत्त्वाच्या नियुक्त्यांवरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो. या काळात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली होती. तसेच प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती सुनील तटकरे यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
या सर्व निर्णयांचा तपशील निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला होता. जर हा संपूर्ण पत्रव्यवहार रद्द ठरला, तर या सर्व नियुक्त्यांवरही प्रश्न निर्माण होऊ शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
सुनेत्रा पवार यांनी हे पत्र पाठवताना पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी कोणतीही सखोल चर्चा केली नव्हती. यामागे पार्थ पवार यांची भूमिका असल्याचीही चर्चा रंगली आहे.
दरम्यान, या पत्रामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणींची जाणीव झाल्यानंतर सुनेत्रा पवार आता ते पत्र मागे घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. काही वरिष्ठ नेत्यांनी परिस्थितीची गंभीरता त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी आपला निर्णय पुनर्विचार करण्यास सुरुवात केल्याचे समजते.
या घडामोडींचा परिणाम सध्या सुरू असलेल्या सर्वोच्च न्यायालयामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्हाबाबतच्या प्रकरणावरही होऊ शकतो. त्यामुळे या पत्राचे राजकीय आणि कायदेशीर परिणाम अधिक गंभीर मानले जात आहेत.
Letter Bomb Rocks NCP, Sunetra Pawar’s Move Triggers Turmoil
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर