Ashok Kharat : अशोक खरातची पत्नी कल्पना खरात विरोधात लुकआऊट नोटीस जारी

विशेष प्रतिनिधी

नाशिक :Ashok Kharat  शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात हा बेकायदेशीर सावकारीचा व्यवसाय करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या धंद्यात त्याची पत्नी कल्पना खरात हिचादेखील सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. ती देशाबाहेर पळून जाऊ नये यासाठी प्रशासनाने आता तिच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे.Ashok Kharat

अशोक खरातच्या बेकायदेशीर सावकारी प्रकरणात सहआरोपी म्हणून नाव येताच कल्पना खरात फरार झाली आहे. पोलिस तिचा कसून शोध घेत आहेत. मात्र लूक आऊट नोटिसीमुळे तिचा परदेशात पळण्याचा मार्ग आता पूर्णपणे बंद झाला आहे.Ashok Kharat

शिर्डीत शेतकरी फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारकीच्या गुन्ह्यात अडकलेली भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरात हिच्याविरोधात शिर्डी पोलिसांनी आता ‘लुकआऊट नोटीस’ जारी केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना खरात फरार असून पोलिस तिचा कसून शोध घेत आहेत. यापूर्वी अशोक खरातनेही परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, जो पोलिसांनी हाणून पाडला होता. आता त्याची पत्नीदेखील देशाबाहेर पलायन करण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ही कडक पाऊले उचलली आहेत.Ashok Kharat



लुकआऊट नोटीस जारी झाल्यामुळे देशातील सर्व विमानतळांवर कल्पना खरातची माहिती देण्यात आली असून, तिच्या परदेश प्रवासावर पूर्णपणे बंदी आली आहे. पोलिसांनी तिची सर्व बाजूंनी नाकेबंदी केली असून कोणत्याही मार्गाने ती देश सोडू शकणार नाही याची खबरदारी घेतली आहे. या कारवाईमुळे फरार आरोपी कल्पना खरातच्या मुसक्या आवळण्यासाठी आता पोलिसांना मोठे यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

अशोक खरातने विविध पतसंस्थांमध्ये शेकडो बँक खात्यांवर स्वतःला नॉमिनी म्हणून नोंदवून घेतल्याचा संशय आहे. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे अनेक खात्यांशी एकाच मोबाईल नंबरची लिंक आढळली असून तो नंबर स्वतः खरात वापरत असल्याचा संशय आहे. त्यामुळे या सर्व व्यवहारांवर त्याचा थेट ताबा होता का, याचा तपास सध्या सुरू आहे.

Lookout Notice Issued Against Ashok Kharat’s Wife Kalpana Kharat

महत्वाच्या बातम्या