विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut सुरुवातीला मोदी काही तरी करतील असं वाटल्याने लोकांनी त्यांना मतदान केले. मात्र ते फक्त आयटी सेलचा फुगवलेला फुगा निघाले, असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. या सोबतच त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही खोचक टीका केली आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अस्तित्वाची देश दखल घेत नाहीये. सुरुवातीला मोदी काहीतरी करतील असं वाटल्याने लोकांनी त्यांना मतदान केले. परंतु गेल्या दोन निवडणुकीत ते मत चोरीने सत्तेवर आले आहेत, त्यामुळे ते काही जनतेच्या मतावर निवडून आलेले लोकनेते नाहीत. ते केवळ आयटी सेलचा फुगवलेला आहेत. ते पाकिस्तान ला ताब्यात घेणार होते, चीनला लाल आख दाखवणार होते, दाखवला का?’ असा सवाल करत खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींना चांगलेच धारेवर धरले आहे. Sanjay Raut
राज्याची अवस्था नेपाळ सारखीच
पुढे राऊत यांनी, गेल्या ३ महिन्यांमध्ये राज्य चालवण्यासाठी सरकारने २४ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोपही केला. ‘मात्र तरीही आपल्या राज्याची अवस्था ही नेपाळसारखीच झालेली आहे. राज्यात बेरपजगरी आहे, विकासाची कामं ठप्प पडली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांकडून एसआरएची कामे सुरू आहेत, त्यातून त्यांना पैसे मिळत आहेत. मानवी वस्त्यांमध्ये कबुतरांना दाणे टाकण्याचे काम सुरू आहे. या पलीकडे महराष्ट्रात काहीही सुरू नाही’ असंही राऊत यांनी नमूद केलं.
भाजपाच्या व्यापारी डावाचे मोदी हे ‘सीईओ’
यानंतर राज्यामध्ये जात विरुद्ध जात अशी भांडणं लावत लोकांचे लक्ष विचलित केले जात आहे. फक्त आरक्षणाच्या नावावर प्रत्येक जात रस्त्यावर आणली जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. महाराष्ट्राने या सरकारच्या काळात शिक्षणापासून ते रोजगारापर्यंत काय प्रगती केली यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी जाहीर संवाद साधला पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी केले. पुढे त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरही निशाणा साधत, ‘ट्रम्प डोळे दाखवत आहेत तरी पंतप्रधान शांत आहेत. दहशतवादी हल्ले करणाऱ्या देशासोबत क्रिकेट मॅच खेळायला लावत आहेत. हा भाजपाचा एक व्यापारी डाव आहे’, असा आरोप केला. पुढे त्यांनी मोदी हे या व्यापारी डावाचे सीईओ असल्याचं देखील म्हटलं. Sanjay Raut
राऊत यांनी केवळ मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यावरच नाही तर संपूर्ण महायुती सरकारवरही तोफ डागली. ‘महाराष्ट्रावर 10 लाख कोर्टीच्या वर कर्जाचा डोंगर तयार झाला आहे. राज्याची आर्थिक दुरावस्था इतकी कधीच झाली नव्हती. आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार यावर काही भाष्य करणार आहेत का?, असा सवाल राऊत यांनी केला आहे. त्यांना आर्थिक शिस्तीची फार काळजी असते. मुख्यमंत्री फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार, आणि डाकू मानसिंग हे महाराष्ट्र लुटायलाच बसलेले आहेत. अमित शहांच्या कृपेने ते चंबळ खोऱ्यातूनच आले आहेत, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला आहे.
पुढे अनेक घोटाळ्यांवर बोलतांना संजय राऊत म्हणाले की, ‘राज्यावर 9 लाख कोटी रुपयांचे कुणी केले आहे, कोणत्या योजनेमुळे हे कर्ज झाले आहे? महाराष्ट्राचे आणि पुढच्या पिढीचे काय होणार? चारही बाजूने महाराष्ट्र ओरबडला जात आहे. जो पैसा महाराष्ट्राच्या तिजोरीत यायला हवा तो पैसा कुणाच्या तरी खिश्यात जात आहे. समृद्धी, शाक्तिपीठ महामार्ग अशी अनेक योजनांचे 2 लाख कोटी रुपयांची कामे मुंबई मनपाच्या माध्यमातून देण्यात आले ते केवळ कागदावर आहेत. कंत्राटदारांकडून 25 टक्के कमिशन घेतले आहे. मुंबईच्या एसआरएमध्ये जे कल्याणकर नावाचे अधिकारी बसले आहेत त्यांच्याबद्ल रोज ऐवढी माहिती येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री याविषयी काय करत आहेत? गरिबांच्या हक्कांवर गदा आणून हा पैसा कुठे वळवला जात आहे? कोणता राजकीय पक्ष, कोणत्या नेत्यांकडे जात आहे? मंगलप्रभात लोढा यांच्या खात्यात सर्वात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. याचा लाभ भाजपचे लोक घेत आहे, लाडकी बहिण, एसआरए, कौशल्य विकास योजनेत मोठा घोटाळा सुरू आहे.’ Sanjay Raut
केवळ इतकेच नाही तर, ‘आम्ही नेपाळचा संदर्भ दिला तर ते आम्हाला नक्षलवादी ठरवतात, पण अशा प्रकारेच नेपाळ लुटला आणि मग लोकांचा उद्रेक झाला त्यांचे मी समर्थन करत नाही. इतके कर्ज झाल्यावर प्रगतिपथावरील राज्य म्हणता का? आता 10 लाख कोटीचे कर्ज आहे तर ते 11 लाख कोर्टीचे होऊ द्यात, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. तुम्ही शेतकऱ्यांना काही दिले नाही मग कर्ज झाले का? फक्त लाडक्या बहिण योजनेसाठी कर्ज झाले असेल तर तुमच्या खिशातून द्यावे. या योजनेत अनेक घोटाळे झाले आहेत, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला.
आता या सगळ्या आरोपांवर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री काही उत्तर देतील का, याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागून आहे. Sanjay Raut
Maharashtra’s situation is similar to Nepal: Sanjay Raut targets government
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा