चांदीवाल आयोगाचा अहवाल खुला करा ! अनिल देशमुख यांची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : १०० कोटी रुपयांच्या वसुलीसंदर्भातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल खुला करण्याची मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. याबाबत देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्मरणपत्र लिहिले आहे. Anil Deshmukh



आपल्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने ३० मार्च २०२१ रोजी कमिशन ऑफ इन्क्वायरी अॅक्ट, १९५२ अंतर्गत उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक न्यायिक आयोग नेमला होता. या आयोगाने सर्व पुराव्यांची सखोल शहानिशा करून २६ एप्रिल २०२२ रोजी सुमारे १४०० पानांचा विस्तृत अहवाल सुपूर्द केला आहे.

कमिशन ऑफ इन्क्वायरी अॅक्ट’च्या नियमांनुसार असा अहवाल ठराविक कालावधीत सार्वजनिक करणे हे सरकारचे वैधानिक कर्तव्य आहे. अशा चौकशी आयोगाचे निष्कर्ष लोकांसमोर मांडणे हे प्रशासकीय पारदर्शकतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे देशमुख म्हणाले.

“Make Chandiwal Commission Report Public,” Demands Anil Deshmukh

महत्वाच्या बातम्या