विशेष प्रतिनिधी
अमरावती :अचलपूर-परतवाडा या शहरांसह संपूर्ण अमरावती जिल्हा हादरवून सोडणाऱ्या आक्षेपार्ह व्हिडीओ आणि लैंगिक शोषण प्रकरणात मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर याने 180 मुलींचे लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ बनवल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने २१ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. Blackmailing
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाले होते. या माध्यमातून मुलींचे लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग होत असल्याचे समोर आले होते.आरोपी अयान अहमद हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स विशेषतः इंस्टाग्राम आणि टेलिग्राम यांचा वापर करून अल्पवयीन मुलींशी संपर्क साधायचा. सुरुवातीला मैत्री, नंतर प्रेमाचे नाटक आणि त्यानंतर विश्वास संपादन करून त्यांचं लैंगिक शोषण करताना अश्लील चित्रीकरण करायचा. या मुलींच्या इच्छेविरुद्ध काढलेले फोटो आणि व्हिडिओ तो सोशल मीडियावर प्रसारित करत होता. या प्रकरणात तब्बल १८० हून अधिक मुलींचे व्हिडिओ प्रसारित झाल्याचा दावा करण्यात आला असून, काही वृत्तांनुसार हा आकडा ३५० व्हिडिओपर्यंत जाऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये जबरदस्तीने अश्लील कृत्ये करायला लावली. त्यानंतर हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून पीडितांना ब्लॅकमेल केले गेले.
हे प्रकरण समोर येताच परिसरात संतापाची लाट उसळली. सुरुवातीला पीडितांच्या सुरक्षिततेमुळे कोणीही समोर येण्यास धजावत नव्हते, मात्र प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ग्रामीण पोलिसांनी स्वत:हून फिर्यादी होत गुन्हा दाखल केला आणि रात्रीतून कारवाई करत मुख्य आरोपीला जेरबंद केले.
अमरावती जिल्ह्यात सोशल मीडियावर काही संशयास्पद ग्रुप तयार करण्यात आले आहेत. शिक्षणाच्या नावाखाली स्थानिक विद्यार्थ्यांना या ग्रुपमध्ये समाविष्ट केले जात होते. त्यानंतर त्यांचे मोबाइल क्रमांक मिळवून काही तरुण त्यांच्याशी मैत्री करत. त्यांचे मोबाइल हॅक करत. मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून त्यांना ब्लॅकमेल केले जात आहे.
खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी यामागे एक मोठी संघटित टोळी कार्यरत असल्याचा आरोप केला आहे. मोहम्मद अयान आणि मोहम्मद झोयान या तरुणांनी १८० हून अधिक मुलींचे सुमारे ३५० आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केले असून, या माध्यमातून मुलींना देह व्यापारासाठी धमकावले जात असल्याचा दावा बोंडे यांनी केला आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करून आरोपींवर मकोका लावण्याची मागणीही त्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
परतवाड्यातील महिला अत्याचार प्रकरण अत्यंत गंभीर असून त्यातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाणार, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. बावनकुळे म्हणाले, हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांशी तातडीने चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेतली आहे. लोकप्रतिनिधींनी पुरावे पोलिसांकडे सादर केले असून सखोल चौकशी सुरू आहे.
ग्रामीण पोलिस दलाने या प्रकरणाचा अत्यंत संवेदनशीलतेने तपास सुरू केला आहे. साध्या वेशातील महिला पोलिस पथके पीडितांच्या मदतीसाठी तैनात असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘पीडित तरुणींची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. पीडितेची कोणतीही चूक नाही, त्यांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे’, असे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्पष्ट केले आहे.
एका पक्षाचा नेता असलेला अयाज मोहम्मदनं जवळपास 180 मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. तो एमआयएम पक्षाचा पदाधिकारी आहे. मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर महापालिका निवडणुकीच्यावेळी असदुद्दीन ओवैसी यांच्या स्टेजवर रील बनवताना दिसला होता. त्याचे पक्षातील नेत्यासोबत फोटो देखील आहेत.
खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनावर गंभीर आरोप केलेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटमध्ये सुमारे १८० मुली अडकल्या असण्याची शक्यता आहे. यातील बहुतांश मुली अल्पवयीन आहेत. हे प्रकरण केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित नसून, हे एक मोठे षडयंत्र असल्याचं बोंडे म्हणालेत.
अत्याचार झालेल्या महिला-मुलींपर्यंत महिला पोलीस पोहोचू शकतात. त्यांच्याकडून मोठी माहिती मिळू शकते. परतवाडा चिखलदरा शहरातील हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळू शकतात. गेल्या सहा महिन्यातील हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले तर त्यामधून एक मोठा रॅकेट पुढे येईल, असेही अनिल बोंडे म्हणाले.
अमरावती जिल्ह्यात सोशल मीडियावर अनेक अश्लील व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सुमारे ३५० हून अधिक व्हिडीओ आणि असंख्य आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाले आहेत. या प्रकरणामुळे अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. अल्पवयीन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या गुन्हेगारी टोळीविरुद्ध कडक कारवाई करा, अशी मागणी आता केली जातेय.
अमरावती ग्रामीण पोलीस दलाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलीस अधिकारी विशाल आनंद सिंगुरी यांनी सांगितले की, जर अद्याप कोणीही पीडित पुढे येऊन तक्रार नोंदवत नसेल तरी सायबर सेलच्या माध्यमातून पुराव्यांचे गोळा केले जात आहेत. व्हायरल झालेले व्हिडिओ सायबर पोलिसांच्या मदतीने सोशल मीडियावरून हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकरणातील पीडितांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.
Man Arrested in Amravati for Allegedly Exploiting 180 Girls, Filming Obscene Videos and Blackmailing Victims
महत्वाच्या बातम्या
- CM : महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत देण्याचा निर्णय हे महात्मा फुले यांना खरे अभिवादन, मुख्यमंत्र्यांची भावना
- Amol Mitkari : अमोल मिटकरींनी यांची ‘जस्टिस फॉर दादा’ आंदोलनाची हाक
- “महात्मा फुले यांच्या विचारांची आज सर्वाधिक गरज” – अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी फुलेवाड्यात व्यक्त केली खंत!
- भुजबळांचे हेलिकॉप्टर थेट कार पार्किंगमध्ये! मोठा अनर्थ टळला..