विशेष प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. यातच मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जरांगे पाटील यांना एका युट्यूब चॅनेलच्या कमेंटमधून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
आमचा एक मेंबर तुमच्यामध्ये घुसून पाटलाचा गेम करणार. आता दहा मिनिटात पाटलाचा कार्यक्रम होणार अशी धमकी देण्यात आली होती. ही धमकी बजाज बिष्णोई याच्या अकांऊटवरून देण्यात आली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिस अलर्ट झाले आहेत. जरांगे यांची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. शिवाय जरांगे यांना भेटण्यासाठी जे लोक येत आहेत त्यांची तपासणी केल्यानंतरच त्यांना भेटीसाठी पाठवले जात आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशी धमकी आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
सध्या सोशल मीडियावर कॉमेंटचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. व्हायरल कॉमेंटचा स्क्रिन शॉटमध्ये उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून येऊन गेम करणार अशी धमकी मनोज जरांगे पाटील यांनी देण्यात आली आहे. बजाज बिश्नोई लीडर नावाच्या फेक अकाऊंटवरुन जरांगे पाटील यांना धमकी देण्यात आली आहे. व्हायरल स्क्रीन शॉर्टनंतर पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेमध्ये वाढत केली आहे. तसेच मनोज जरांगेंच्या भेटीसाठी येणाऱ्या इच्छुक उमेदवारांची तपासणी करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे चार ते पाच जणांनी प्रत्येक मतदारसंघात फॉम भरून ठेवा 29 किंवा 30 तारखेला मतदार संघ जाहीर करू आणि तेव्हा उमेदवार देखील जाहीर करू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
Manoj Jarange Patil Receives Death Threat
महत्वाच्या बातम्या
- Nura Kushti माहीममध्ये नुरा कुस्ती की शिंदेंचा शिलेदार राज ठाकरेंच्या लेकाला झुंजविणार
- Uddhav Thackeray उध्दव ठाकरेंनी वाढवले महाविकास आघाडी टेन्शन, सांगोल्यातून दीपक साळुंखे यांना उमेदवारी जाहीर
- Shiv Sena शिवसेना शिंदे गटाची 45 उमेदवारांची यादी जाहीर, बहुतांश विद्यमान आमदार
- Amit Thackeray : मनसेचे ठरले, अमित ठाकरे माहीम मधून लढणार, खडकवासल्यात मयुरेश वांजळे