Supriya Sule : सरसकट कर्जमाफी दिली नाही, तर मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, सुप्रिया सुळे यांचा इशारा

Supriya Sule : सरसकट कर्जमाफी दिली नाही, तर मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, सुप्रिया सुळे यांचा इशारा

Supriya Sule

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Supriya Sule  शेतकऱ्यांना एका महिन्यात सरसकट कर्जमाफी दिली नाही, तर मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.Supriya Sule

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज सकाळी नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी करत सरकारला गंभीर इशारा दिला. हा मोर्चा एका मोठ्या संघर्षाची सुरुवात असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.सुप्रिया सुळे म्हणाल्या, आज आपण सरसकटSupriya Sule

कर्जमाफीसाठी एकत्र आलो आहोत. हा मोठ्या संघर्षाचा प्रारंभ आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन कलेक्टरना भेटा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवा की त्यांनी दिलेला शब्द पाळावा. ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी द्या, असे त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. जर एका महिन्याच्या आत शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही, तर या सरकारला आम्ही महाराष्ट्रभर कुठेही फिरू देणार नाही. मंत्र्यांना गावोगाव रोखले जाईल, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिला.Supriya Sule



सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवरूनही सरकारवर टीका केली. महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. त्यासाठी निधी मंजूर केला, पण पहिल्याच टप्प्यात पंचवीस लाख महिलांची नावे कमी केली. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. गावा-गावात, वस्त्यावस्त्यांवर जाऊन आंदोलन करू आणि महिलांना त्यांचे पैसे मिळवून देऊ, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

तुम्ही म्हटला होता सरसकट कर्जमाफी करु. आम्हीही एकदा असा शब्द दिला होता. तेव्हा युपीएचे सरकार होते. मनमोहन सिंह हे पंतप्रधान होते. आदरणीय पवार साहेब कृषीमंत्री होते. तेव्हा एक -दोन नाही तर तब्बल सत्तर हजार करोड रुपयांची कर्जमाफी केली होती. शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला होता, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

नाशिक जिल्हा बॅंकेने 65 हजार शेतकऱ्यांची नावे कमी करुन, त्या जागेवर नवीन कुठली तरी नावे घेतली. आमच्यावर अन्याय केल्याची माहिती मला एका शेतकऱ्याने दिली. आम्ही सगळे आठ खासदार दिल्लीला जाऊ. आम्ही केंद्र सरकारकडे न्याय मागू आणि नाशिक जिल्हा बॅंकेची चौकशी लावण्याची जबाबदारी आजपासून आमची असा शब्द सुप्रिया सुळेंनी शेतकऱ्यांना दिला. शेतकऱ्यासाठी कितीही आंदोलने करु पण न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.

Ministers will not be allowed to roam the state if loan waiver is not provided, warns Supriya Sule

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023