विशेष प्रतिनिधी
मुंबई : MLA Shrinivas Vanga शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी मिळाली नसल्याने एक विद्यमान आमदार चक्क गायब झाले आहेत. त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे. MLA Shrinivas Vanga
महायुतीमध्ये पालघरच्या जागेवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे नाराज झाले आहेत. विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे श्रीनिवास वनगा हे प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार होते असे त्यांच्या पत्नीने सांगितले. MLA Shrinivas Vanga
Sachin Sawant : सचिन सावंतावर वरुण सरदेसाई भारी, गळ्यात मारली अंधेरी, सावतांनी नाकारली उमेदवारी
गेल्या १२ तासांपासून श्रीनिवास वनगा हे नॉट रिचेबल आहेत. श्रीनिवास वनगा हे काल संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घराबाहेर पडले. त्यांनी घरातून बाहेर पडताना आपण कुठे जातोय हे कोणालाही सांगितलं नाहीत. त्यांचे दोन्हीही फोन बंद आहेत. श्रीनिवास वनगा हे घराबाहेर पडून आता १२ तास उलटले आहेत. त्यांनी कोणाशीही संपर्क साधलेला नाही. यामुळे श्रीनिवास वनगा यांच्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे. सध्या श्रीनिवास वनगा यांचा पोलीस शोध घेत आहेत.
MLA Shrinivas Vanga not reachable
महत्वाच्या बातम्या
- Shiv Sena UBT : शिवसेना ‘UBT’ने जाहीर केली आणखी एक उमेदवार यादी !Ajit Pawar : अजित पवारांना माेठा धक्का, दाेन विद्यमान आमदारांनी घेतली शरद पवारांच्या पक्षाची उमेदवारी
- Ajit Pawar : घरी बोलावता , जेऊ घालता आणि अदृश्य हात तुतारीसाठी वापरता? अजित पवारांचे हर्षवर्धन पाटील यांच्यावर जाहीर टीका
- Congress काॅंग्रेसची २३ जणांची यादी जाहीर, लहू कानडे यांना नाकारली उमेदवारी