विशेष प्रतिनिधी
नागपूर : Nagpur NGO शहरातील मानकापुर परिसरात कार्यरत असलेल्या एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकावर धर्मांतरणासाठी दबाव, मानसिक छळ आणि महिलांचे शोषण केल्याचे गंभीर आरोप समोर आले असून, या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.Nagpur NGO
या प्रकरणात आरोपी रियाज फाजिल काजी याच्याविरोधात काही महिलांनी तक्रार दाखल केली असून, मानकापुर पोलिसांनी गुन्हा नोंदवत चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संस्थेत काम करणाऱ्या महिलांवर धार्मिक प्रथा पाळण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता, तसेच विरोध केल्यास धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप आहे.Nagpur NGO
तक्रारदार महिलांनी गंभीर आरोप केले आहेत.धार्मिक आचार-विचार स्वीकारण्यासाठी जबरदस्ती होत होती.
नमाज आणि रोजा पाळण्यास भाग पाडणे मानसिक छळ आणि भीतीचे वातावरण निर्माण करणे. नोकरी सोडल्यास अप्रत्यक्ष धमक्या देणे. पीडितांच्या मते, या सर्व प्रकारांमुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला.
काही सामाजिक कार्यकर्त्यांना या संस्थेतील संशयास्पद हालचालींबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर संबंधित महिलांशी संपर्क साधून अधिक माहिती घेण्यात आली. काही महिलांनी आधीच संस्था सोडली होती. त्यानंतर त्यांना पोलिसांकडे तक्रार करण्यास प्रवृत्त करण्यात आले आणि प्रकरण अधिकृतपणे समोर आले.
या प्रकरणावर विविध सामाजिक संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विश्व हिंदू परिषदेसहित काही संघटनांनी निष्पक्ष आणि सखोल चौकशीची मागणी केली
आहे.यासंदर्भात पोलीस उपायुक्तांकडे निवेदन देत, या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रियाज काजी हा गेल्या काही वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असल्याचे सांगितले जाते. त्याच्या संस्थेमार्फत वंचित मुलांना शिक्षण देण्याचे काम केले जात होते. यासाठी त्याला काही पुरस्कारही मिळाल्याची माहिती आहे. मात्र, आता समोर आलेल्या आरोपांमुळे त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांची भूमिका
मानकापुर पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, संबंधित कर्मचारी, संस्थेतील इतर सदस्य आणि आर्थिक व्यवहारांचीही तपासणी केली जात आहे.
तसेच, संस्थेला मिळालेल्या निधीचा स्त्रोत आणि त्याचा वापर याचीही चौकशी करण्यात येत आहे.
Nagpur NGO head faces serious conversion and exploitation allegations, SIT probe demanded
महत्वाच्या बातम्या