नरेश अरोराच्या “डिझाईन बॉक्स”कंपनीला झटका; राष्ट्रवादी अजित पवार गटाचा करार रद्द!

विशेष प्रतिनिधी

पुणे: राज्याचा राजकारणार महत्वाची आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी घटना घडली आहे.राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवडणूक रणनितीकर नरेश अरोरा यांचा “डिझाईन बॉक्स”कंपनीसोबतचा करार रद्द करण्यात आला आहे.राज्याचा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी हा निर्णय घेतला आहे.पक्षातील अंतर्गत नाराजी आणि रणनीती बाबत गंभीर मतभेट निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही वरिष्ठ नेते आणि आमदारांमध्ये मागील काही दिवसांपासून “डिझाईन बॉक्स”कंपनीच्या कामाबाबत नाराजी होती.निवडणूक रणनीतीतील निर्णय आणि सल्ले घेताना पक्षाच्या मूळ धोरणाच्या विरोधात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती.पक्षातील काही विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्याबाबत दिल्या गेलेल्या सूचनामुळे पक्षात नाराजीचा सूर असल्याचे सांगितले जात आहे.



विधान परिषदेचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी काही महिन्यांपूर्वी नरेश अरोरावर टीका केली होती.यानंतर अमोल मिटकरींनी नरेश अररोरबाबत पोस्ट करत आरोप केले आहेत.अमोल मिटकरी यांनी पोस्ट मध्ये लिहिले आहे की,”अजित दादांच्या विमानाचा घातपात की अपघात या चर्चेतील मुख्य आणि लक्ष नसलेलं पात्र म्हणजे डिझाईन बॉक्स वाला गडी,नरेश अरोरा!राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत नरेश अरोरा अजित पवारांना चुकीची माहिती देत,तसेच पक्षाकडून आर्थिक लाभ आणि रक्कम घेतल्यानंतर देखील नरेश अरोराच्या “डिझाइन बॉक्स”कंपनीकडून कोणतेच काम झाले नव्हते.नरेश अरोराकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा सूचना देखील देण्यात आल्या होत्या.राष्ट्रवादी पक्ष्याचा जोरावर अरोराने एक विमान कंपनी देखील स्थापन केली असल्याचे अमोल मिटकरी यांनी सांगितले.

“डिझाईन बॉक्स”कंपनीसोबत करार रद्द केल्यानंतर अजित पवार गट नव्या पद्धतीने आपली रणनीती आखण्याचा तयारीत आहे.स्थानिक पातळीवरील संघटन मजबूत करून आणि नवीन सल्लागाराच्या मदतीने प्रचार मोहीम राबविली जाणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.पक्षातील असंतोष कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला असल्याचे सांगितले जात आहे.

Naresh Arora’s “Design Box” company suffers setback; Nationalist Ajit Pawar group’s contract cancelled!

महत्वाच्या बातम्या