विशेष प्रतिनिधी
अकोला : प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका नवविवाहितेचे अपहरण करून धर्मांतर केल्याचा आणि नंतर निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या आईवडिलांना अटक केली आहे. भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. killed in akola
पीडित तरुणी ही नांदखेडा (ता. मंगरुळपीर) येथील रहिवासी होती. ३ फेब्रुवारी २०२५ रोजी तिचे लग्न वर्धा येथील एका तरुणाशी झाले होते. पीडितेच्या गावातीलच सादिक शाह नावाचा तरुण तिला ओळखत होता. सादिक हा अकोल्यात भाड्याने खोली घेऊन राहत असे. पीडितेचे लग्न झाल्यानंतर सुमारे महिनाभराने तो वर्ध्यात पोहोचला आणि त्याने पुन्हा तिच्याशी संपर्क साधला.
पीडितेच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपनुसार सादिक शाहने विवाहितेची दिशाभूल करून तिला सासरहून पळवून नेले. त्यानंतर सुमारे आठ महिने ते मुंबईत विविध ठिकाणी राहिले. काही काळापूर्वी ते अकोल्याला परतले, जिथे ती गर्भवती असल्याचे समोर आले.८ मार्च २०२६ रोजी पीडितेने एका बाळाला जन्म दिला. मात्र, बाळंतपणानंतर अवघ्या सहाव्या दिवशी म्हणजे ६ एप्रिल २०२६ रोजी तिची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह अकोल्यातील डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका मोकळ्या मैदानात विवस्त्र आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेत स्थानिकांना आढळून आला. पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे.
खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आरोप केला की, “पीडितेचे धर्मांतर करून तिचे नाव बदलण्यात आले. तिला मानसिक आणि शारीरिक यातना दिल्या गेल्या आणि शेवटी तिची हत्या करण्यात आली. हे केवळ एका व्यक्तीचे काम नसून यामध्ये सादिकच्या कुटुंबासह अनेक लोकांचा समावेश आहे.”
आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करावी. मुख्य आरोपी सादिक शाह आणि त्याच्या कुटुंबीयांची नार्को टेस्ट करावी. ते ज्या ज्या ठिकाणी राहिले, त्या सर्व ठिकाणांची सखोल चौकशी व्हावी. यासह आरोपींच्या अवैध बांधकामांवर तातडीने कारवाई करावी, अशा मागण्या खासदार अनिल बोंडे यांनी केल्या आहेत.p
या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. सध्या एका आरोपीला ताब्यात घेतले असून, शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल,” असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Newlywed abducted, killed in akola; police probe alleged forced conversion
महत्वाच्या बातम्या