विशेष प्रतिनिधी
मुंबई : Thackeray brothers भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बिनशर्ट, बिनशर्ट म्हणता म्हणता त्यालाच बिनशर्त तीनदा भेटले, अशा शब्दांत भाजपने गुरूवारी राज ठाकरे यांची वारंवार भेट घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मनसेने आपला एकही उमेदवार उभा न करता या लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. यावरूनच उद्धव ठाकरे यांनी मागील वर्षीच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंवर टीका केली होती. ‘केवळ मला विरोध करण्यासाठी काहींनी भाजपला ‘बिनशर्ट’ पाठिंबा दिला’ या शब्दात त्यांनी राज ठाकरे यांना सुनावले होते. तसेच, निवडणुकीत आपले कोण व परके कोण हे स्पष्ट झाले आहे. Thackeray brothers
केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून काही लोकांनी उघडपणे म्हणजेच बिनशर्ट पाठिंबा दिला आहे, असे ते म्हणाले होते. परंतु आता राजकीय समिकरणात बरेच बदल होत आहेत. यासोबतच आता राज ठाकरे व उद्धव ठाकरे देखील एकत्र आलेत. हे दोघे बंधू वारंवार एकमेकांच्या भेटी घेतांना दिसत आहेत. या भेटी पुढील राजकीय रणनीती ठरवण्यासाठी आहेत, असे अंदाज बांधले जात आहे.
मात्र आता याच भेटींवरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘बिनशर्ट, बिनशर्ट म्हणता म्हणता त्यालाच बिनशर्त तीनदा भेटले. केवळ आणि केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी आता मशालीला इंजिनाचे वंगण फासले,’ असे त्यांनी म्हटले आहे. उपाध्ये यांच्या या टीकेची महाराष्ट्रच्या राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली आहे. Thackeray brothers
यात विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी काल म्हणजेच बुधवारी राज ठाकरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. मात्र या भेटीत त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत व अनिल परब हे देखील होते. अनिल परब यांना ठाकरे गटाचे मुंबईतील रणनीतीकार मानले जाते. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या या भेटीत ठाकरे गट व मनसेच्या संभाव्य आघाडीची रुपरेषा ठरल्याचा दावा केला जात आहे. ही विशेष तयारी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी केली जात असल्याची चर्चा देखील रंगली आहे. Thackeray brothers
‘Now the engine oil has been spilled on the torch’; BJP strongly criticizes after Thackeray brothers’ meeting
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा