विशेष प्रतिनिधी
बीड : माझ्याकडे प्रत्येक जिल्ह्याचा रेकॉर्ड आहे, मुळशी पॅटर्नच्या घटना आहेत. पण ज्या जिल्ह्यातून सगळ्यात जास्त ऊस तोड कामगार जातात, त्याला आमदार सुरेश धस यांनी बदनाम केले, असा आरोप पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चर्चेत आला आहे. या हत्येनंतर मुंडे विरुद्ध इतर नेते असे बीडमध्ये चित्र रंगले आहे. मात्र बीड जिल्ह्यात गुन्हेगारी आहे, बीडचा बिहार झाले अशी बनामी होत आहे. यावरून पंकजा मुंडे संतप्त झाल्या असून आमदार सुरेश धस यांनी जिल्ह्याची बदनामी केल्याचा आरोप केला आहे.
मुंडे म्हणाल्या, मी महिला म्हणून खासदार राहिले. केशरकाकू, प्रितम मुंडे सगळ्या महिलांनी काम केलं. ज्या जिल्ह्यातून सगळ्यात जास्त ऊस तोड कामगार जातात, त्याला बदनाम करण्यात आलं. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असते तर दरोडे घातले असते. माझ्याकडे प्रत्येक जिल्ह्याचा रेकॉर्ड आहे, मुळशी पॅटर्नच्या घटना आहेत.
धस यांच्यावर काय बोलू? मी कुठं गप्प आहे असा सवाल करत मुंडे म्हणाल्या, मी एसआयटीची मागणी केली होती. पहिली मागणी मी केली. आता जे ते बोलताय ते पूर्वी का बोलले नाही. मागच्या 2 वर्षात का बोलले नाही?
गृह विभागाने निर्णय घेतलाय. त्यांनी आश्वासन दिलं आहेकी कारवाई करणार आहेत, एका तरुणाची निर्घृण हत्या झाली. ज्यांना राजकारण करायचं ते करत आहेत.धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते जर म्हणत असतील की शोध लागत नाही तोपर्यंत कारवाई करणार नाही. त्यावर मी काऊंटर करणार नाही. शोध लागेपर्यंत कारवाई करणार नसतील तर त्यावर मी रोज काय बोलू?