विशेष प्रतिनिधी
मुंबई: Navnath Ban पत्रा चाळ घोटाळ्यात आरोपी असलेल्या व्यक्तींनी एसआरएच्या पारदर्शक प्रकल्पांवर प्रश्न उपस्थित करू नयेत. तुमच्याकडे पुरावा असेल तर एकही कागद दाखवा, अन्यथा खोटं पसरवू नका कोविड काळात मृतांच्या टाळूंवर लोणी खाणाऱ्यांना एसआरएवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे म्हणत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी उबाठावर टीकास्त्र डागले आहे.
संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर केलेल्या टीकेला उत्तर देतांना, नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरेंप्रमाणे देवेंद्र फडणवीस त्यांच्या शब्दापासून पळ काढत नाही. आम्ही आमच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफी करण्याचा शब्द दिला आहे. त्यानुसार फडणवीस सरकारने २०१७ मध्ये ऐतिहासिक कर्जमाफी केली, मराठवाड्यासाठी जलसंपत्ती प्रकल्प देखील सुरू केले. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या सरकारनेच हे प्रकल्प थांबवले होते. Navnath Ban
महाराष्ट्रावर इतके कर्ज असतांना मोदींचा वाढदिवस साजरा करण्याची राज्य सरकारला काय गरज आहे? असा सवाल देखील संजय राऊत यांनी केला होता. या आरोपांवर उत्तर देत असतांना बन म्हणाले की, मोदींचा वाढदिवस हा केवळ सरकारचा नाही तर, तो संपूर्ण १४० कोटी जनतेचा उत्सव आहे. राऊतांचा वाढदिवस भांडुपच्या गल्लीत तरी साजरा होतो का? असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.
याच सोबत राऊत यांनी नरेंद्र मोदी यांचा व्यापारी डावातील सीईओ असा उल्लेख केला होता. त्यावर बोलतांना, ज्यांनी आयुष्यात एकदाही जनतेतून निवडून येण्याची हिंमत केली नाही, त्यांनी जनतेने तीन वेळा निवड्डून दिलेल्या मोदींवर बोलण्याचा अधिकार नाही असे, नवनाथ बन म्हणाले. Navnath Ban
नवनाथ बन यांनी शरद पवारांनी केलेल्या काही आरोपांवरही त्यांना सुनावले आहे. ‘शेतकरी आत्महत्यांचा काळा इतिहास पवारांच्या सरकारचा आहे. त्यांच्या काळात दीड लाखाहून आधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. २००८ साली जाहीर झालेल्या ७२ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा फक्त ३२ टक्के शेतकऱ्यांना झाला आणि बाकीचे शेतकरी मात्र फसले. सुप्रिया सुळे वांग्याच्या शेतीतून करोडो कमावतात, पण सामान्य शेतकऱ्याला हजार रुपयेही मिळत नाहीत. रोहित पवार दूध व्यवसायातून लाखो मिळवतात, पण आमचा शेतकरी त्याच पिकातून, त्याच गाईम्हर्शीमधून तोट्यात जातो. ही ‘गुप्त टेक्नॉलॉजी’ फक्त पवार कुटुंबापुरती आहे का? असा थेट सवाल नवनाथ बन यांनी केला.
नवनाथ बन म्हणाले की, जनाब संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत एसआरएमध्ये काय घोटाळा झाला अशा पद्धतीचे पोकळ दावे केले. खरं तर कोरोना काळात मराठी माणूस मरत असताना राऊतांनी हजारो कोटी रुपयांचे घोटाळे केले. पत्रा चाळीमध्ये हजारो मराठी माणसांना बेघर करण्याचे काम त्यांनी केले. कामगारांसाठी वाटल्या जाणाऱ्या खिचडीमध्ये सुद्धा त्यांनी घोटाळा केला, असे म्हणत बन यांनी राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. Navnath Ban
ज्यांनी मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार म्हणजे कफन घोटाळा ही केला. ज्यांनी मृतांच्या टाळूवरचे लोणी खाल्ले, त्यांना एसआरएबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही. एसआरएचे सर्व प्रकल्प अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवले जात आहेत आणि त्यात कोणताही बेकायदेशीर व्यवहार झाला नसल्याचं बन यांनी स्पष्ट केलं.
नवनाथ बन म्हणाले की, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, मेट्रो, अटल सेतू यासारखे प्रकल्प आम्ही पारदर्शकपणे राबवले आहेत. प्रत्येक पैशाचा हिशोब आमच्याकडे आहे. तुमच्या काळात फक्त १०० कोटींची वसुली आणि खंडणीचा बाजार सुरू होता. तुम्ही जनतेसाठी नाही, तर स्वतःसाठी अलिबागला फार्महाऊस बांधले. जनतेच्या पैशातून आम्ही विकास घडवतो, तुम्ही मात्र लूट करता. हा फरक महाराष्ट्राची जनता ओळखते असे बन यांनी सांगितले. Navnath Ban
Patra Chawl scam accused should not speak on SRA; Navnath Ban
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा