समस्येच्या वेळी लोकांना मनसेची आठवण, पण मतदानाच्या वेळेस विसर, राज ठाकरे यांची खंत

विशेष प्रतिनिधी

मुंबई : प्रत्येक समस्येच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होते. पण नेमकं मतदानाच्या वेळेस पक्षाचा विसर पडतो, अशी खंत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात खंत व्यक्त करताना म्हटले आहे की,मुंबईसारख्या महानगरात जी महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथे मराठी माणसाला असुरक्षित वाटते. तरुण मुलामुलींच्या हाताला काम मिळत नाही.

पण त्याच वेळी बाहेरच्या राज्यातून येणाऱ्याaना नोकरीच्या संधी मिळतात. बेरोजगाराला जात नसते, पण त्याला ती जात जाणवून देऊन, जातीजातीत भांडणं लावली जात आहेत. शेतकऱ्यापासून ते सर्वच कष्टकऱ्यांच आयुष्य महागाईने होरपळून निघत आहे. या आणि इतर आणि इतर प्रत्येक समस्येच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होते.पण नेमकं मतदानाच्या वेळेस पक्षाचा विसर पडतो.

राज ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे की, पण ठीक आहे, हे स्वीकारून आपण आता काही बदलांसकट पुढे जायला हवं. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेचे निकाल लागल्यानंतर मी काही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालो, पण मुद्दाम राजकीय भाष्य टाळलं. नक्की काय घडलं यावर माझं मंथन सुरु आहे आणि लवकरच मी या सगळ्यावर सविस्तर बोलेन.


Devendra Fadnavis महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या यादीत पहिल्या दहा मध्ये ही नाहीत!


महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे की जे घडलं ते विसरून जा. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पुढे काही आठवड्यातच मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरु झाली, आणि त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका द्यावा अशी अपेक्षा व्यक्त झाली आणि जे आपण केलं देखील. मुळात मराठी माणूस हा फक्त मतदानासाठी वापरला जातोय हे वास्तव अधोरेखित झालं. त्यात महिलांविरोधात अत्याचार वाढतच आहेत. राज्यातले दोन समाज जे दोन्ही मराठी भाषिक, पण त्यांच्यात संघर्ष पेटला आहे. आणि महागाईने लोकं होरपळली आहेत, असं आवाहन त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नेतेमंडळींना केले आहे.

सर्व प्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! कालगणनेत या वर्षाला एक महत्व आहे , कारण या शतकातील, पाव शतक संपायला आलं. माणसाच्या आयुष्यातल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रांत इतके प्रचंड बदल झालेत की २५ वर्षांपूर्वीच आयुष्य हे वेगळं युग वाटावं. या २५ वर्षांच्या कालखंडात आपला पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्याची स्थापना झाली, तो स्थिरावला, पक्षाने अनेक चढउतार पाहिले. आणि हे सगळं आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून गेलं”, असं राज ठाकरे आपल्या पोस्टच्या सुरुवातीलाच म्हणाले आहेत.

People remember MNS at the time of problem, but forget it at the time of voting, Raj Thackeray said

महत्वाच्या बातम्या