Married woman : विवाहित महिलेवर अत्याचार, ब्लॅकमेलिंग; राजकीय नेत्याच्या मुलाविरोधात गुन्हा

विशेष प्रतिनिधी

बीड : Married woman  जिल्ह्यातील एका राजकीय पुढाऱ्याच्या मुलाविरोधात विवाहित महिलेला ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे.Married woman

पीडित महिला सध्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे वास्तव्यास असून मूळची बीड शहरातील चऱ्हाटा रोड परिसरातील आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी अमर बांगर याने तिला सातत्याने ब्लॅकमेल करत मानसिक आणि शारीरिक छळ केला.Married woman



फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीने महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत वारंवार अत्याचार केले. तसेच, ही बाब कोणाला सांगितल्यास किंवा पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.

याचबरोबर आरोपीने पीडित महिला आणि तिच्या कुटुंबाकडून मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. कुटुंबाची बदनामी होऊ नये या भीतीपोटी कुटुंबीयांनी आरोपीला मोठी रक्कम दिली, मात्र त्यानंतरही छळ सुरूच राहिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आरोपी अमर बांगर हा जिल्ह्यातील प्रभावशाली राजकीय पुढाऱ्यांच्या निकटवर्तीयांपैकी असून पंचायत समितीच्या माजी सभापतींचा मुलगा असल्याने या प्रकरणाची जिल्हाभर चर्चा सुरू झाली आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या तक्रारीवरून बलात्कार, खंडणी, धमकी तसेच गुंगीचे औषध देऊन शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली असून पुढील तपास सुरू आहे.

Political leader’s son booked for rape, blackmail in Beed, Married woman alleges repeated assault,

महत्वाच्या बातम्या