“तुम्ही एम्सला लागणार”; विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडतानाचा मोटेगावकरांचा व्हिडिओ चर्चेत

विशेष प्रतिनिधी

 

पुणे: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या ताब्यात असलेल्या शिवराज मोटेगावकर बद्दल अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शिवराज मोटेगावकरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होतोय.संबंधित व्हिडिओत शिवराज मोटेगावकर विद्यार्थ्यावर जादूटोणा करत असल्याचा चर्चा सध्या सुरू आहेत. व्हायरल व्हिडिओत एका तांब्यात असलेले पाणी मोटेगावकर विद्यार्थ्यावर गवताच्या सहाय्याने शिंपडताना दिसत आहे.मात्र हे पाणी विद्यार्थ्यांच्या अंगावर शिंपडताना ” तुम्ही एम्सला लागणार ” असा जप मोटेगावकर करत असल्याचे स्पष्ट ऐकू येत आहे.

क्लासेस मधील विद्यार्थ्यांचा चांगल्या निकालासाठी पेपर फोडणाऱ्या शिवराज मोटेगावकरचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, मोटेगोकरकडून विद्यार्थ्यावर जादूटोणा करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय.



निकालानंतर विद्यार्थ्यांना गंध लावण्याची देखील चर्चा..

देशातील नीट किव्वा कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यानंतर शिवराज मोटेगावकरच्या कोचिंग क्लासेस मध्ये मोठा जल्लोष साजरा करण्यात येतो.यावेळी परीक्षेत चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते,मात्र या सत्कार सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना कुंकवाचा टिळा लावण्यात येतो,त्यामुळे ज्याठिकाणी विज्ञानाच्या जोरावर विद्यार्थ्यांचे करिअर घडायला हवेत, त्याठिकाणी पाणी शिंपडून गुणवत्तेची हमी देणे, हे योग्य आहे का? असा सवाल आता संतप्त नागरिक आणि पालक उपस्थित करत आहेत.

You will have to go to AIIMS”; Video of Motegaonkar sprinkling water on students in discussion

महत्वाच्या बातम्या