विशेष प्रतिनिधी
पुणे: विधानपरिषद स्थानिक स्वराज्यसंस्थेची निवडणूक जाहीर होताच पुण्यातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे.उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ आल्याने पुण्याचा जागेवरून राष्ट्रवादी आणि भाजपा संघर्ष वाढीस लागतोय.जिल्ह्यातील संख्याबळाचा आधार घेतं भाजपाने ही जागा आपल्याच मिळावी, यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठीवपुरावा सुरू केला आहे.निवडणुका लक्षात घेतां भाजपाने संघटनात्मक ताकद आणि स्थानिक संस्थांमधील संख्याबळ यावर भर देऊन दावा ठोकला आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे, मात्र त्यापूर्वीच महायुतीमध्ये हालचालींना वेग आला आहे.पुण्याची जागा परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिल्याने अजित पवार गटाकडून देखील या जागेवर दावा कायम आहे.मात्र भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी देखील पुण्याचा जागेबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.
भाजपाचे गणित काय?
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगरपायंचतीमधील संख्याबळाचा आधार घेत भाजपाने पुण्याचा जागेवर आपला हक्क सांगितला आहे.स्थानिक पातळीवर भाजपाचे ३०९ सदस्य आहेत.याशिवाय मित्रपक्ष आणि अपक्षांची साथ मिळाल्यास हा आकडा वाढू शकते, असं मत भाजप नेत्यांनी व्यक्त केलं आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पारंपरिक मतदारसंघ म्हणून पुण्याची जागा कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्यामुळे महायुतीच पुण्याचा जागेवरून रस्सीखेच वाढली असून आता अंतिम निर्णयाकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
BJP’s claim on Pune seat is strong; Ajit Pawar group is also firm
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश