विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: देशाच्या संसदीय कामकाजात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या खासदारांचा गौरव करणाऱ्या प्रतिष्ठित ‘ संसद रत्न पुरस्कार २०२६ ‘ ची घोषणा करण्यात आली असून, यंदाच्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने विशेष छाप सोडली आहे.देशभरातील निवडक खासदारांमधून महाराष्ट्रातील तब्बल पाच खासदारांची निवड करण्यात आली आहे.
यावर्षी देशभरातील १२ खासदार आणि ४ संसदीय समित्यांची संसदरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.त्यात महाराष्ट्रातील ५ खासदारांचा समावेश आहे.विशेष म्हणजे, या यादीत २ महिला खासदारांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या खासदारांचा समावेश?
महाराष्ट्रातून यंदाच्या संसदरत्न पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, डॉ.हेमंत विष्णू सावरा, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि खासदार स्मिता वाघ यांची निवड करण्यात आली आहे.
ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांना सलग दुसऱ्यांदा ‘ संसद रत्न ‘ पुरस्कार जाहीर झाला आहे.खासदारकीच्या पहिल्याच टर्म मध्ये त्यांना मागच्या वर्षी ‘ संसद रत्न ‘ पुरस्कार प्राप्त झाला होता.तर शिवसेनेचे लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील दुसऱ्यांदा ‘ संसद रत्न ‘ पुरस्कार देण्यात येणार आहे.
संसदेत प्रभावी मांडणी आणि सातत्यपूर्ण उपस्थितीसाठी उपस्थितीसाठी ओळखायला जाणाऱ्या मेधा कुलकर्णी आणि स्मिता वाघ यांचा देखील या यादीत समावेश करण्यात आला आहे.
संसद रत्न पुरस्काराचा सोळावा सोहळा जुलै 2026 यावेळी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे.या सोहळ्यात १५० पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. संसद रत्न पुरस्काराचे संस्थापक प्राईम पॉईंट फाउंडेशनचे श्रीनिवासन आणि संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा प्रियदर्शनी राहुल यांनी या पुरस्काराची घोषणा नवी दिल्ली येथे केली.
Maharashtra dominates Parliament! Five MPs get ‘Sansad Ratna Award 2026’
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश