विशेष प्रतिनिधी
मुंबई : अधिकाऱ्यांच्या मानेवर तलवार ठेवून कोणालाही जात प्रमाणपत्र काढता येत नाही. त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र जमा करावी लागतील. पुरावे द्यावे लागतील, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना सुनावले आहे. केवळ याचा राजकीय फायदा किंवा राजकीय स्टंट करून काँग्रेस पक्ष राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. OBC reservation
पत्रकारांशी बाेलताना बावनकुळे म्हणाले की, ओबीसीच्या ताटातले आरक्षण हे दुसऱ्यांच्या ताटात जाणार नाही, याची काळजी सरकारने घेतली आहे. सरकार ओबीसींची काळजी घेत आहे. ओबीसीसाठी जे जे करणे शक्य आहे, ते सर्व निर्णय आपण घेत आहोत. या संदर्भात कॅबिनेट उपसमितीची बैठक 10 तारखेला सकाळी 11 वाजता बोलावण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासंदर्भात विजय वडेट्टीवार यांच्या मनात काही शंका असतील तर त्यांनी उपसमिती समोर मांडाव्यात. या बैठकीत त्यावर विचार केला जाईल. ओबीसींचे नुकसान होत असेल तर उपसमिती योग्य निर्णय घेईल, असे देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे.
अधिकाऱ्यांच्या मानेवर तलवार ठेवून जात प्रमाणपत्र काढता येत नाही. जी कागदपत्र आहेत, ती कागदपत्र अर्जासोबत जमा करावी लागतील, ती दिल्यानंतरच प्रमाणपत्र मिळेल. ओबीसी प्रमाणपत्र द्यायचे असेल तर किंवा इतर कोणतेही प्रमाणपत्र द्यायचे असतील, तर प्रमाणपत्र देताना विभागाच्या वतीने त्या प्रमाणपत्र देताना काही प्रक्रिया असते. त्यासाठी लागणारे कागदपत्रांची यादी असते. अर्जाचे नमुने आहेत. त्यासाठीची कागदपत्र लागतात. ती सर्व जमा करावी लागतील, त्यानंतर प्रमाणपत्र वितरित करता येतात. प्रमाणपत्र देताना आधी कुणबी नोंदणी आहे, त्याचा दाखला द्यावा लागणार असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 17 सप्टेंबर पर्यंत ओबीसी प्रमाणपत्र न मिळाल्यास पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरातीमध्ये दिसत आहे. असे असताना विरोधकांच्या पोटात का गोळा उठला? असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेमापोटी एखादी जाहिरात आली तर विरोधकांच्या पोटात का गोळा उठला? अशा एक नाही तर हजारो जाहिराती देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल येतील. एखाद्या व्यक्तीचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रेम असेल आणि त्याने प्रेमापोटी जाहिरात दिली असेल. राज्यातील 14 कोटी जनतेसाठी चांगले निर्णय फडणवीसांनी घेतले आहे. महाराष्ट्र विकसित होत आहे. अशा प्रेमापोटी त्यांनी स्वतःचे नाव दिले नसेल. तर त्याला काय फरक पडतो? मात्र त्या जाहिराती मधील भावना काही वेगळी आहे का? भावनेचा आदर केला पाहिजे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Political stunt on OBC reservation issue, Chandrashekhar Bawankule accuses Congress of doing politics
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा