तर महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप, खरात प्रकरणावरून विजय वडेट्टीवार

विशेष प्रतिनिधी

नागपूर: खरातची वरात आता कुठेपर्यंत जाते हे येणारा काळ सांगेल. त्या पेनड्राईव्हमधील सगळ्या व्हिडिओ दाखवल्या तर महाराष्ट्र सरकारला हादरे बसतील आणि सरकारच अडचणीत येईल असे महाभाग या खरातच्या कृत्यामध्ये सहभागी आहेत.ते जर उघड झाले तर महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप येऊ येऊ शकतो, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. Vijay Wadettiwar



विजय वडेट्टीवार म्हणाले की, अशोक खरात प्रकरणी राज्यात जे वातावरण निर्माण झाले आहे ते गंभीर आहे. काल आमदार केसरकर यांनी एक विधान केले की खरातला 39 आमदार भेटले माझेच नाव का घेता? याचा अर्थ असा की खरातच्या काळ्या कृत्याला साथ देणारे, त्यावर पांघरुण घालणारे, तिथे पुजा करणारे, भोंदू गिरी वाढवणारे 39 जे आमदार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. कायदे बनवणारे जर कायद्याविरोधात वागत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. केसरकरांनी त्या 39 आमदारांची यादी जाहीर केली पाहिजे.
मोदी सरकार आणि भाजपने देश वाऱ्यावर सोडला आहे. देशाची काळजी या सरकारला राहिली नाही, केवळ निवडणूक जिंकत सत्ता मिळवणे याकडे त्यांचे लक्ष आहे. देश संकटात असताना नेते प्रचाराचे भाषण करत फिरत आहेत. लोकांना लाइनमध्ये उभे करत जीव घेण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे, तरीही हे सांगतात की काही तुटवडा नाही, असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, रशियाने इंधन देण्यास नकार दिला आहे, मित्र देश असलेला इराण शत्रू झाला आहे. हिंदू-मुस्लीम करत देश पुढे जाऊ शकत नाही. इंधन टंचाईमुळे कोणाचे बळी गेले तर भाजप सरकार त्यासाठी जबाबदार असेल. टंचाई नाही म्हणता मग अकोल्यात जो बळी गेला तो कसा झाला आहे.

Political Tremors in Maharashtra Over Kharat Case: Vijay Wadettiwar Reacts

महत्वाच्या बातम्या