विशेष प्रतिनिधी
पुणे: पाली भाषेला केंद्र सरकारने ‘अभिजात भाषे’चा दर्जा बहाल केल्यानंतर, पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात आता आणखी एका ऐतिहासिक सोहळ्याची भर पडणार आहे. पुण्यात पहिले ‘अभिजात पाली भाषा साहित्य संमेलन’ आयोजित करण्याबाबतचे नियोजन सुरू झाले असून, या संमेलनाला महापालिकेने सर्वतोपरी सहकार्य करावे, अशी मागणी नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. Abhijat Pali Language Literature Meet
संयुक्त विद्यमाने आयोजनाचा मानस
अभिजात पाली भाषा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रताप लोखंडे यांनीदेखील यासंदर्भात पुढाकार घेतला आहे. पुणे महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अभिजात पाली भाषा साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन शहरात पार पडावे, अशी विनंती प्रशासनाला करण्यात आली आहे.
भारतीय ज्ञानपरंपरेत पाली भाषेचे महत्त्व!
पाली भाषा ही केवळ एक प्राचीन भाषा नसून ती भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा कणा आहे. भगवान बुद्धांचे धम्मचक्र प्रवर्तन आणि त्यांचे सर्व उपदेश मूळ पाली भाषेतूनच जनमानसापर्यंत पोहोचले. सम्राट अशोकांच्या काळातील शिलालेख असोत किंवा प्राचीन विद्यापीठांमधील ज्ञानसाधना, पाली भाषेने भारतीय संस्कृतीला जागतिक ओळख मिळवून दिली आहे. या भाषेतील साहित्य हे शांतता, करुणा आणि मानवी मूल्यांचा वारसा जपणारे असल्याने त्याचे संवर्धन होणे काळाची गरज आहे.
पुण्याच्या सांस्कृतिक वारशात मानाचा तुरा!
पुणे हे विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. येथे होणारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने किंवा सवाई गंधर्व सारखे महोत्सव पुण्याच्या सांस्कृतिक उंचीचे दर्शन घडवतात. आता पुण्यात पहिले ‘अभिजात पाली भाषा साहित्य संमेलन’ आयोजित होणे, हे पुणेकरांसाठी अभिमानास्पद ठरणार आहे.
या संमेलनामुळे पुणेकर नागरिकांना आणि विशेषतः युवा पिढीला भारतीय संस्कृतीच्या मुळाशी असलेल्या पाली भाषेचा परिचय होईल. पाली भाषेतील तज्ज्ञ, संशोधक आणि साहित्यिकांसाठी हे संमेलन विचारांच्या देवाणघेवाणीचे मोठे केंद्र ठरेल.
Pune to Host First ‘Abhijat Pali Language Literature Meet’; Corporator Salegaonkar Petitions Commissioner
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर