विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडवणारे घायवळ बंधू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.कुख्यात गँगस्टर निलेश घायवळविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) लावण्यात आल्यानंतर आता त्याचा सख्खा भाऊ सचिन घायवळ हा पुणे पोलिसांच्या रडारवर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याच्याविरोधातही मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पोलिसांचे पथक या संदर्भात पुरावे गोळा करत आहे. Sachin Ghaywal
निलेश घायवळ हा सध्या फरार असून, त्याचे शेवटचे लोकेशन लंडनमध्ये असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्याच्याविरोधात लुक-आऊट नोटीस जारी करण्यात आली असून, गुन्हे शाखेच्या टीमने त्याचे आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि संपर्क जाळे यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
सचिन घायवळ आणि त्याचे साथीदार यांच्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार एका बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, २०२२ ते २०२३ दरम्यान घायवळ टोळीने इमारतीतील १० सदनिका जबरदस्तीने बळकावल्या आणि त्या इतरांना भाड्याने देऊन आर्थिक लाभ घेतला.
तक्रारीत म्हटले आहे की, आरोपींनी “निलेश घायवळच्या परवानगीशिवाय येथे कोणतेही बांधकाम होऊ शकत नाही” असे सांगून बांधकाम थांबवले, तसेच तक्रारदाराकडून सदनिका देण्याची मागणी केली. नंतर सदनिका ताब्यात घेऊन बापू कदम या व्यक्तीद्वारे भाड्याची रक्कम निलेशकडे पोहोचवली जात होती, असेही पोलिस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात सचिन घायवळसह सात जणांविरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे, आणि पोलिसांनी त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर चौकशी सुरू केली आहे. गेल्या १५ दिवसांत निलेश घायवळविरुद्ध पाचवा गुन्हा नोंदवला गेला असून, पोलिसांनी नागरिकांना पुढे येऊन तक्रारी नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
सचिन घायवळला शस्त्र परवाना मिळण्यामागे कोणाचा हात आहे, यावरून राजकीय वातावरण तापले आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर या परवान्याच्या शिफारशीचा आरोप होत असून, विरोधकांनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
कदम यांनी बचाव करताना सांगितले की, “सुनावणीच्या दिवशीपर्यंत सचिन घायवळविरुद्ध कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते.” मात्र, पोलिसांकडून समोर आलेल्या गुन्ह्यांच्या यादीनंतर प्रश्न उपस्थित होत आहे की, अशा पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला परवाना देण्यामागे राजकीय दबाव होता का?
पुणे पोलिसांनी घायवळ बंधूंच्या टोळीची चौकशी तीव्र केली आहे. त्यांच्या नावावर असलेली स्थावर मालमत्ता, फ्लॅट व्यवहार, आणि बांधकाम क्षेत्रातील जबरदस्ती प्रकरणांची एकत्रित चौकशी गुन्हे शाखेने हाती घेतली आहे.
पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की, “घायवळ बंधूंची टोळी सतत स्थानिक बांधकाम व्यावसायिक आणि जमीन व्यवहारात हस्तक्षेप करत होती. सध्या त्यांच्या विरोधात जमा झालेले पुरावे पाहता मोक्का अंतर्गत कारवाईची शक्यता आहे.”
Sachin Ghaywal is now on the radar of the police following Nilesh’s trail, preparations are underway for action under MOCCA after the Kothrud case
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा