विशेष प्रतिनिधी
Sachin Sawant महाविकास आघाडीच्या राजकारणात शिवसेना ठाकरे गट काॅंग्रेसला कस्पटासमान वागणूक देत असल्याचे पुन्हा एकदा समाेर आले आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात अंधेरीची जागा काॅंग्रेसच्या गळयात मारून ठाकरे गटाने वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी दिली आहे.Sachin Sawant
काँग्रेस पक्षाची तिसरी यादी जाहीर झाली. ज्यानंतर सचिन सावंत यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. मात्र त्यांना अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली. त्यामुळे ते नाराज झाले आहेत. वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई उमेदवार आहेत. आता सचिन सावंतही या जागेसाठी आग्रही आहेत. त्यांनी याबाबत काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांना विनंती केली आहे.
महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील काही काँग्रेस नेत्यांची दिल्लीत शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली. यानंतर २६ ऑक्टोबर रोजी सकाळी काँग्रेसकडून २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. तर आताही १६ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिम हा मतदारसंघ दिला आहे. मात्र सचिन सावंत हे या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक नाहीत. त्यांनी वांद्रे पूर्व हा मतदारसंघ मागितला आहे. त्यामुळे आता या जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच पाहण्यास मिळणार अशी चिन्हं आहेत.
सावंत म्हणाले, जागावाटपात काँग्रेसला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत, पण काँग्रेसला फक्त 10 जागा मिळाल्या हे अतिशय खेदजनक आहे. मला दिलेली जागा अंधेरीची आहे पश्चिमेकडे स्थानिकांचा विरोध होता. ती जागा स्थानिक उमेदवाराला द्यावी वांद्रे पूर्वेची जागा आम्हाला मिळेल अशी आशा होती पण ही जागा ठाकरे सेनेकडे गेली. आम्ही कार्यकर्ते आहोत. पक्ष हायकमांडला मान्य असेल तो निर्णय आम्हाला देखील मान्य आहे.
Sachin Sawant Upset over seat sharing, Rejects Candidacy from Andheri
महत्वाच्या बातम्या
-
Shiv Sena UBT : शिवसेना ‘UBT’ने जाहीर केली आणखी एक उमेदवार यादी !Ajit Pawar : अजित पवारांना माेठा धक्का, दाेन विद्यमान आमदारांनी घेतली शरद पवारांच्या पक्षाची उमेदवारी
-
Ajit Pawar : घरी बोलावता , जेऊ घालता आणि अदृश्य हात तुतारीसाठी वापरता? अजित पवारांचे हर्षवर्धन पाटील यांच्यावर जाहीर टीका
-
Congress काॅंग्रेसची २३ जणांची यादी जाहीर, लहू कानडे यांना नाकारली उमेदवारी