विशेष प्रतिनिधी
मुंबई : तुम्ही कोण आहात? तुमचे काय धंदे आहेत, याचेही आत्मचिंतन करावे. मग तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबावर बोला. फार आमच्या नादाला लागू नका. सध्या तुम्ही थोडक्यात बचावलेले आहात, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिला आहे. Sanjay Raut
संजय राऊत यांनी नाशिक जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे दोन्ही पक्ष मिळून महानगरपालिकांच्या निवडणुका जिंकणार, असा दावा केला. ठाकरेंनी मिळून किमान एक तरी महापालिका जिंकून दाखवावी, केवळ तोंडाच्या वाफा घालवून काही होत नाही, अशी टीका भाजपा नेते मंत्री गिरीश महाजनांनी केली आहे.
यावर प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले की, गिरीश महाजन म्हणजे महर्षी व्यास नाही. त्यांनी काहीही बोलावे, काहीही करावे. त्यांनी सर्वात पहिल्यांदा स्वतःच्या खाली काय जळत आहे, ते पाहावे. ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल, त्या दिवशी त्यांची काय अवस्था असेल, त्यादिवशी ते कुठे असतील? याचा त्यांनी विचार करावा. तोंडाच्या वाफा कोण दवडंतय आणि कोण नाही हे उद्या ठाकरे बंधूं राजकीयदृष्ट्या एकत्र झाल्यावर त्यांना कळेल. फडणवीसांचे हे जे चोर, लफंगे, दरोडेखोर यांना रस्त्यावर फिरणे मुश्किल होईल, असा टोला राऊतांनी लगावला.
राऊत म्हणाले की, आज तुमची जी मस्ती आहे ती लुटलेल्या पैशांची मस्ती आहे. मिस्टर महाजन ही तुमची सत्तेची मस्ती आहे. तुम्ही असे समजू नका की तुम्ही म्हणजे प्रमोद महाजन. तर असे नाही, तुम्ही जामनेरचे गिरीश महाजन आहात
Sanjay Raut Warns Girish Mahajan: “Mind Your Own Business, Don’t Mess With Us”
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला