अशोक खरात प्रकरणात पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्यावर गंभीर आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. Ashok Kharat case

दमानिया यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत दत्ता कराळे हे अशोक खरात यांच्या कार्यक्रमात उपस्थित असल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये सवाल केला आहे की, इतक्या वरिष्ठ पदावर असलेले पोलिस अधिकारी अशा वादग्रस्त व्यक्तीच्या कार्यक्रमात का सहभागी झाले? एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी भाषणही केले. सामान्य नागरिकांना असा संदेश गेल्यास खरातसारख्या व्यक्तींवर विश्वास निर्माण होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



दत्ता कराळे यांच्या कॉल रेकॉर्डमध्ये देखील संशयास्पद बाबी असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या मते, अशोक खरात यांच्याशी संबंधित 18 कॉल्सचा उल्लेख आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी डिपार्टमेंटल व्हिजिलन्स मार्फत व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, या प्रकरणात पोलीस महासंचालकांनी स्वतः लक्ष घालून उत्तरदायित्व निश्चित करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, यापूर्वीच या प्रकरणात अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या बहिणीचीही चौकशी झाली होती. त्यामुळे या प्रकरणाचा आवाका केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून विविध स्तरांवर त्याचे धागेदोरे पसरले असल्याचे स्पष्ट होत आहे.

Serious allegations against IG Dutta Karale in Ashok Kharat case

महत्वाच्या बातम्या