विशेष प्रतिनिधी
सापुतारा : गुजरातमधील सापुतारा येथे नाशिक-गुजरात महामार्गावर एक खासगी बस २०० फूट खोल दरीत कोसळून भयानक अपघात झाला आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण गंभीर जखमी झाले. अपघात इतका भीषण की. बसचे घाटात कोसळल्यानंतर दोन तुकडे झाले.
चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. पहाटे ४ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास सापुतारा हिल स्टेशनजवळ बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, अशी माहिती पोलीस अधीक्षक एस.जी. पाटील यांनी दिली आहे. अपघात झालेल्या बसमध्ये ४८ प्रवासी प्रवास करत होते. ही बस रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले बॅरिकेड्स तोडून खोल दरीत कोसळली, असेही त्यांनी सांगितले.
भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अर्थसंकल्पाचे कौतुक
बसमधील ४८ भविकांना घेऊन बस नाशिकत्या त्र्यंबकेश्वरहून गुजरातमधील द्वारका येथे जात होती, यादरम्यान हा अपघात झाला. दरम्यान बसमधील भाविक हे मध्य प्रदेशमधील गुणा, शिवपुरी आणि अशोक नगर जिल्ह्यातील आहेत.
Seven people died after a accident private bus fell into a 200 feet deep gorge
महत्वाच्या बातम्या
- Nirmala Sitharaman’ : कॅन्सरवरील औषधे, टीव्ही, मोबाईल आणि इलेक्ट्रिक कार होणार स्वस्त
- Modi Govt : मोदी सरकारची मध्यमवर्गीयांना आजपर्यंतची सर्वात मोठी भेट, एक लोक कोटी तोटा सहन करून १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
- Devendra Fadnavis भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अर्थसंकल्पाचे कौतुक
- नामदेव शास्त्री टीकेचीही तयारी ठेवा, मनसे नेते प्रकाश महाजन यांचा धनंजय मुंडे भेटीवरून इशारा