Mumbai local train : लोकल ट्रेनमध्ये दरवाजात बॅग घेऊन उभं राहण्यास बंदी; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Mumbai local train : लोकल ट्रेनमध्ये दरवाजात बॅग घेऊन उभं राहण्यास बंदी; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Mumbai local train

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत लोकल ट्रेनमध्ये (Mumbai local train)  प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गर्दीच्या वेळी होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी आता लोकल ट्रेनच्या दरवाजात बॅग घेऊन उभं राहण्यास रेल्वे प्रशासनाने बंदी घातली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा-दिवा दरम्यान घडलेल्या भीषण अपघातानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. चार प्रवाशांचा मृत्यू आणि अनेक जखमी झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोहमार्ग पोलिसांनी एकत्रितपणे ही कारवाई हाती घेतली आहे.



मुंब्रा-दिवा दरम्यान घडलेल्या अपघातात दोन लोकल ट्रेन एकमेकांच्या शेजारी असताना प्रवाशांच्या खांद्याला बॅग लागल्यामुळे आठ प्रवासी थेट ट्रॅकवर पडले. चार जणांचा मृत्यू झाला, तर इतर गंभीर जखमी झाले. यामुळे दरवाजात बॅग घेऊन उभं राहणं किती धोकादायक ठरू शकतं, हे पुन्हा अधोरेखित झालं

रेल्वे सुरक्षा दल आणि पोलीस विभागाने गर्दीच्या वेळी विशेषतः संध्याकाळच्या पिक अवरमध्ये, सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, कुर्ला या मुख्य स्थानकांवर अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवाजात उभे असणाऱ्या आणि बॅग घेतलेल्या प्रवाशांवर लक्ष ठेवून त्यांच्याशी संवाद साधून सूचना दिल्या जातील. नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.

येत्या काळात नव्या लोकल ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोजिंग सिस्टम बसवण्याची योजना आहे. सध्या धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्येही अशा यंत्रणेचा समावेश करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. तसेच कल्याण-काशीमधील तिसरी आणि चौथी लाईन, कुर्ला-सीएसएमटी पर्यंत पाचवी आणि सहावी लाईनसाठी आधुनिकीकरणाचे काम सुरू आहे.

मुंबई उपनगरी रेल्वेवर ताण कमी करण्यासाठी सरकारने सरकारी व खासगी कार्यालयांना सल्ला दिला आहे की सर्व कर्मचारी एकाच वेळी ऑफिसमध्ये येणार- जाणार नाहीत, यासाठी ‘स्टॅगर्ड’ इन-आऊट टाइम ठेवावेत. यामुळे पिक अवरमधील गर्दी नियंत्रित करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Standing with bags at the door of local trains is prohibited; Railway administration’s decision for the safety of passengers

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023