विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर: Manoj Jarange मराठा आरक्षणासाठी मुंबईत यशस्वी उपोषण करून परतल्यानंतरही मराठा समाजात संभ्रम कायम असल्याचे पाहून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. जर सरकारने आरक्षण दिले नाही, तर मुंबईकरांना होणारा दूध आणि भाजीपाला पुरवठा थांबवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. हे सर्व बंद केल्यावर मुंबईकर काय वाळू खाणार का? असेही ते म्हणाले.Manoj Jarange
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात पाच दिवस उपोषण केले होते. सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर काढला. या उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. उपचारानंतर ते आज त्यांच्या गावी अंतरवाली सराटीत दाखल झाले. सायंकाळी त्यांनी बीड जिल्ह्यातील नारायण गडावर भेट दिली. यावेळी गुलाल उधळीत त्यांचे स्वागत करण्यात आले. गडावर जाऊन दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.Manoj Jarange
मनोज जरांगे म्हणाले, जर आम्हाला आरक्षण दिले नाही,तर आम्ही मुंबईकरांचा भाजीपाला, दूध बंद करू अशी धमकी मनोज जरांगे यांनी दिली आहे. तसेच हे बंद झाले की मुंबईकर काय वाळू खाणार का? असाही सवाल त्यांनी विचारला आहे. शिवाय आता उपोषण करणार नाही, रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
सरकारने काढलेल्या नवीन जीआरबद्दल बोलताना जरांगे म्हणाले, “या निर्णयामुळे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा होणार आहे.” या जीआरमध्ये काही त्रुटी आढळल्यास, सरकारला सुधारित जीआर काढावा लागेल, असे आम्ही आधीच मान्य करून घेतल्याचे त्यांनी सांगितले. ‘मी खचणार नाही, काही चूक झाली तर आणखी लढा द्यायला तयार आहे’, असेही ते म्हणाले.
यावर्षी दसरा मेळावा होणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली. या वर्षी दसरा मेळाव्याची तयारी करण्यासाठी आता फारसा वेळ नाही. मागच्या वर्षी आपल्याकडे वेळ होता. त्यामुळे मैदान साफ करता आले. या वर्षी मात्र फारसा वेळ नसल्याने जो छोटा-मोठा दसरा मेळावा होईल त्याची तयारी केली जाईल, असेही यावेळी जरांगे यांनी सांगितले. परंपरेनुसार आपण दसरा मेळावा 100 टक्के करायचा. तिथूनच सरकारला तुम्ही काय दिले नाही आणि आम्ही तुमच्याकडून कसे घेतो हे सांगू, असा इशाराही जरांगे यांनी सरकारला यावेळी दिला.
Stop the supply of milk and vegetables to Mumbaikars, Manoj Jarange warns of taking Mumbai back
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा