विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रासह पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका लक्षणीय वाढला असून, वाढत्या तापमानामुळे नागरिकांबरोबरच प्राण्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. दुपारच्या वेळेत तापमान उच्चांक गाठत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राजीव गांधी प्राणी संग्रहालय प्रशासनाने प्राण्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.
कात्रज परिसरातील या प्राणी संग्रहालयात विविध प्रजातींचे प्राणी असल्याने त्यांच्या नैसर्गिक अधिवासासारखे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत. वाढत्या तापमानाचा परिणाम प्राण्यांच्या वर्तनावर आणि आरोग्यावर होऊ नये यासाठी पिंजर्यांमध्ये इरिगेशन प्रणाली बसवण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे ठराविक वेळाने पाणी फवारले जात असून, त्यामुळे परिसरातील तापमान कमी ठेवण्यास मदत होत आहे.
- तालिका सभापती परिस्थिती बघून निर्देश देऊ शकतात, पण ते ब्रह्मवाक्य नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट
याशिवाय, काही प्राण्यांसाठी कृत्रिम तलाव, पाण्याचे टाके आणि सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषतः वाघ, सिंह, अस्वल यांसारख्या प्राण्यांना थंडावा मिळावा यासाठी त्यांच्या अधिवासात ओलावा टिकवून ठेवण्यावर भर दिला जात आहे. पक्ष्यांच्या पिंजर्यांमध्येही पाण्याचे भांडे आणि फवारणीची सुविधा वाढवण्यात आली आहे.
प्राणी संग्रहालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्राण्यांच्या आहारातही बदल करण्यात आला असून, त्यांना थंडावा देणारे आणि पचनास हलके अन्न दिले जात आहे. तसेच पशुवैद्यकीय पथक सतत प्राण्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहे.
The heat of the sun has increased! Special measures for animals at Katraj Zoological Museum
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर