विशेष प्रतिनिधी
बदलापूर : बदलापूरमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या मैत्रिणीने आधी तिला मद्य पाजले आणि तिची शुद्ध हरपल्यानंतर या मैत्रिणीच्या रिक्षाचालक मित्राने पीडितेवर अत्याचार केला.
पीडित तरुणी ही मुंबईला राहणारी असून ती २१ डिसेंबर रोजी बदलापूरला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. यावेळी बदलापूरच्या मैत्रिणीने दत्ता जाधव या तिच्या रिक्षाचालक मित्रालाही सोबत बोलावून घेतलं. या तिघांनी मद्यपान केले. मद्यपान केल्यानंतर पीडित तरुणी शुद्धीत नसल्याचा गैरफायदा घेत रिक्षाचालक दत्ता जाधव याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
पीडित तरुणीच्या मैत्रिणीनेही या कृत्यात त्याची साथ दिली. पीडित तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिच्या हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी तिने २३ डिसेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अवघ्या १२ तासात नराधम रिक्षाचालक दत्ता जाधव याला खरवई परिसरातून बेड्या ठोकल्या.
पोलीस ज्यावेळेस त्याला अटक करण्यासाठी गेले, त्यावेळेस पोलिसांच्या भीतीने तो बहिणीच्या घरातील लोखंडी कपाटात लपून बसला होता. मात्र पोलिसांनी अतिशय शिताफिने त्याला शोधून काढत बेड्या ठोकल्या आहेत. तर त्याच्या या कृत्यात साथ देणाऱ्या त्याच्या मैत्रिणीलाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे.
The rickshaw driver raped the young woman after drinking alcohol
महत्वाच्या बातम्या
- Dr Manmohan Singh : माजी PM मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन; 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा; मोदी म्हणाले- त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे
- Dr. Manmohan Singh माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन
- Nana Patole : परभणी व बीड हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, नाना पटोले यांचा आरोप
- Raju Shetty : सातबारा कोरा झाला नाही तर राज्यव्यापी आंदोलन, राजू शेट्टी यांचा इशारा