विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना चांगलेच सुनावले. आमच्या पक्षात नाक खुपसण्याची गरज नाही असे त्यांनी म्हटले आहे. Ajit Pawar
अजित पवार यांचे पक्षावर आता नियंत्रण राहिलेले नाही. त्यांचा पक्ष प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी हायजॅक केला असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता. यावरून त्यांना सुनावताना अजित पवार म्हणाले, काही लोकांना वाटते की आपण लईच मोठे झालो आहोत. सगळ्या महाराष्ट्राचे नेतृत्व आपल्याकडे आले आहे. मात्र, त्यांनी त्यांच्या पक्षाचे बघावे. आम्ही आमच्या पक्षाचे बघतो. दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसण्याची गरज नाही.
अजित पवार म्हणाले, सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. तसाच प्रयत्न आम्ही देखील करत असतो. पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणे यात काहीही गैर नाही.
रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधताना अजित पवाराचा पक्ष कोकणातील एका नेत्याने ताब्यात घेतल्याचा आरोप केला होता. अजित पवारांच्या पक्षात सर्वजण एका विचाराचे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पण आता अजित पवारांच्याच हातात पक्ष राहिला नाही. दादांनी एका कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणवर निलंबनाची कारवाई केली होती. पण त्यानंतर एका नेत्याने त्याला बढती दिली. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस कोकणातील एका नेत्याने ताब्यात घेतल्याचे चित्र आहे, असे ते म्हणाले होते.
सुनील तटकरे यांनीही रोहित पवार यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. रोहित पवार यांच्या बालिश वक्तव्याची मी फारशी दखल घेत नाही. त्यांनी आपले घर (पक्ष) पेटलेले आहे की, शांत आहे हे त्यांनी पहावे. त्यांनी त्याची अवस्था पहावी. त्यातील अंतर्गत कुरघोड्या पहाव्या. त्यानंतर इतर राजकीय पक्षांवर टीका करण्याचा अधिकार आहे. अजून तुम्ही खूप बालिश आहे, असे ते म्हणाले होते.
There is no need to poke your nose into our party, Ajit Pawar tells Rohit Pawar
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला