विरोधी पक्ष मजबूत होण्यासाठी गावोगावी फिरा, चंद्रकांत पाटील यांचा उद्धव ठाकरेंना उपरोधिक सल्ला

विशेष प्रतिनिधी

पुणे : लोकशाहीत विरोधी पक्ष मजबूत नसेल तर सत्ताधारी पक्ष अंकूश नसल्यासारखा वागू शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी गावोगावी फिरावे असा उपरोधिक सल्ला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. भोंदू अशोक खरातच्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेवर आपले नाव असल्याची बाब आपल्याला आत्ताच समजली असेही त्यांनी स्पष्ट केले. Chandrakant Patil

कारागीर महाकुंभाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना पाटील म्हणाले, मी उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन करेल. जिल्हा परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत त्यांची महाराष्ट्रात एकही सभा झाली नाही. त्यामुळे त्यांना असे वाटले असेल की, प्रयत्ने रगडीता वाळूचे कण, त्यातून निघे तेल. प्रयत्न केले तर यश मिळेल असा त्यांना साक्षात्कार झाला असेल.



भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती. पत्रकारांनी याविषयी चंद्रकांत पाटील यांना छेडले असता त्यांनी आपल्याला याविषयी काहीच ठावूक नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, मला याविषयी काहीही माहिती नाही. माझा प्रॉब्लेम काय झाला आहे की, मी माझ्या विषयाच्या बाहेरच पाहत नाही. हा माझा प्रॉब्लेम व बलस्थानही आहे. आपल्याला दिले ते करा. मोहित कंबोज राहतात कुठे, मुलाची पार्टी की मुलीची पार्टी. आले कोण, का आले, काय करायचे आपल्याला?

भोंदू अशोक खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेवर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची नावे आहेत. पत्रकारांनी याकडे मंत्री पाटलांचे लक्ष वेधले असता ते पत्रकारांना उद्देशून म्हणाले, ही आपली ग्रामीण पद्धतच आहे. तुमच्या घरच्या लग्नाला तु माझे नाव टाका. तुम्ही टाकणारच ते. त्यामुळे ते येणार की नाही येणार? विचारले की नाही विचारले? यापेक्षा एक प्रतिष्ठा असते की एवढ्या सगळ्यांना विचारले. मला आत्ताच कळले की, माझे पत्रिकेवर नाव पत्रिकेवर आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी सव्वा महिन्याच्या अधिवेशनात किमान दोनदा याचे डिटेल निवेदन केले आहे.

Tour Villages to Strengthen Opposition: Chandrakant Patil’s Jibe at Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या