विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे शहरात आज अचानक आलेल्या अवकाळी पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडवली. दुपारच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. शहराच्या पश्चिम भागातील म्हाळुंगे, बाणेर, बालेवाडी आणि बावधन परिसरात गारपीट झाली, तर मध्यवर्ती भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
झाडपडीच्या घटना आणि वाहतूक कोंडी
मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वर्दळीच्या ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. यामध्ये काही खासगी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः जे.एम. रोड (जंगली महाराज रस्ता) परिसरात मोठ्या प्रमाणावर असलेल्या झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्या होत्या. पावसामुळे पडलेला पालापाचोळा आणि गाळाचा थर यामुळे रस्ते निसरडे झाले होते, परिणामी दुचाकी वाहने घसरण्याचे प्रकार घडले आणि शहरात मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.
महापालिकेसाठी ‘अलर्ट’
अचानक आलेल्या या पावसामुळे पुणे महानगरपालिकेच्या पावसाळा पूर्व नियोजनाची पोलखोल झाली आहे. थोड्याच वेळात पडलेल्या जास्त पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या. पावसाळा अद्याप सुरू व्हायचा असतानाच आजच्या पावसाने महापालिकेला एक प्रकारे ‘सावधानतेचा इशारा’ दिला आहे. दरवर्षी पावसाळ्यात पुणेकरांना ज्या वाहतूक कोंडी आणि पाणी साचण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते, त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाला आता युद्धपातळीवर काम करावे लागणार आहे.
महापौर मंजुषा नागपुरे यांचा अॅक्शन मोड!
पुण्याच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांसोबत घेतलेल्या पहिल्याच बैठकीत पावसाळा पूर्व नियोजनाचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, “येत्या पावसाळ्यात पुणेकरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. कामात दिरंगाई झाल्यास कोणतीही कारणे खपवून घेतली जाणार नाहीत.”
आजच्या पावसाने निर्माण झालेली परिस्थिती पाहता, आता महानगरपालिका आगामी पावसाळ्यासाठी कशा पद्धतीने पूर्वनियोजन करते आणि महापौरांच्या सूचनांची अंमलबजावणी कशी होते, याकडे सर्व पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
Unseasonal Rains Lash Pune; Alert for PMC, Mayor Orders Pre-Monsoon Planning!
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर