राज्यात ३० मार्चपासून वादळी पावसाची शक्यता

विशेष प्रतिनिधी

पुणे : राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदलाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली गेली आहे. ३० मार्चपासून ढगाळ वातावरण आणि दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच काही भागांत विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि गारपीट होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे. या भागांत विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. उर्वरित विदर्भातही हवामानात बदल होण्याचा अंदाज आहे.

३१ मार्च रोजी वादळी पावसाचे प्रमाण काहीसे कमी होण्याची शक्यता असली तरी वातावरण पूर्णपणे स्थिर राहणार नाही. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो.

तसेच १ ते ४ एप्रिल या कालावधीत पुन्हा वादळी पावसाची तीव्रता वाढण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील विविध भागांत ढगाळ वातावरण, दुपारनंतर वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीची शक्यता नाकारता येत नाही.

Unseasonal Storms Likely Across Maharashtra from March 30

महत्वाच्या बातम्या